देश-विदेश

‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’

राहुल गांधींची मोदी सरकारकडे मागणी

नवी​ दिल्ली :​
केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर, देशभरात अनेक ठिकाणी सध्या लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे लसीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांना मोफत लस दिली गेली पाहिजे. असं पुन्हा एकदा म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.
राहुल गांधी यांनी अॅडजेक्टिव्ह आणि अॅडवर्बचं उदाहरण देत करोना लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. “भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल.” असं राहुल गांधी यांनी ट्विट करत, सोबत #vaccine असं देखील जोडलं आहे.
तसेच, “चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, अशी टीका या अगोदर राहुल गांधी यांनी केलेली आहे.
“मोदी सरकारने हे लक्षात घेणं आवश्यक आही की लढाई करोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय विरोधकांविरुद्ध नाही.” असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: