गोवा 

‘केरी किनाऱ्यावर लावणार १ हजार सुरुची झाडे’

स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी दिली माहिती

पेडणे (प्रतिनिधी) :
नुकत्याच आलेल्या चक्रीवादळाने केरी आजोबा मंदिर जवळील किनारी भागातील बांधलेली संरक्षण भीत कोसळून किमान चार कोटींचे नुकसान झाले , शिवाय चाळीस ते पन्नास वर्षाची सुरुंची झाडे कोसळले चार पाच स्थानिक व्यावसायीकांच्या शेकचे नुकसान झाले . कोसळलेली भिंत दुरुस्ती करावी आणि त्याठिकाणी किमान १००० नवीन सुरुची झाडे लावली जाईल अशी माहिती , मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी पडझड झालेल्या केरी किनाऱ्याची अधिकाऱ्यासोबत पाहणी केली त्यावेळी स्थानिक पत्रकाराना माहिती देताना सांगितले. यावेळी जलसिंचन खात्याचे कार्यकारी अभियंते प्रमोद बदामी, अधिकारी सालेलकर , अनिल परुळेकर , सत्यवान नाईक , वनाधिकारी नाईक , केरी सरपंच सुरेश नाईक , पंच सुरज तळकर , स्थानिक व्यावसायिक उपस्थित होते .

चाक्रीवादळाचा मोठा तडाखा केरी किनाऱ्याला बसला. आजोबा मंदिर ते केरी फेरी धक्का पर्यंतची उभारलेल्या संरक्षण भीतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे . लक्ष्मिकान्त पार्सेकर आमदार असताना हि संरक्षण भीत सुरुवातीला आठ कोटी रुपये खर्च करून उभारली हळू हळू सोळा कोटी या भिंतीवर खर्च करण्यात आला . त्यामुळे मोठ्या प्रमाणात किनाऱ्याला सुरक्षा मिळाली होती . १६ रोजी आलेल्या चक्रीवादळाने या संरक्षण भीतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानी केली . किमान चार कोटी रुपये नुकसान झाले आहे . या भिंतीची अधिकाऱ्यांसोबत आमदार दयानंद सोपटे यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना भिंतीच्या दुरुस्तीबाबत पुढील प्रक्रिया करण्याची सुचना केली .

या किनाऱ्यावर असलेल्या स्थानिक सहा व्यावसायीकांच्या पर्यटन हंगामातील शेकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , पर्यटकांची सोय करणाऱ्या पर्यटन विकास महामंडळ तर्फे उभारलेल्या शौचालय , चेंजिंग रूम यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे .

लवकरात लवकर भिंतीची दुरुस्ती करावी , केरी किनारा पर्यटकाना शिवाय अनेक चित्रपट निर्माते यानाही आकर्षित करत आहे , जी झाडे मोडून किनारा विद्रूप झाला , त्याची वनखात्याने स्वच्छता करून पुन्हा स्थानिक सामाजिक संस्था नागरिक समर्थकांच्या सहकार्याने या किनाऱ्यावर किमान १००० नवीन झाडे लावण्याचा संकल्प आमदार दयानंद सोपटे यांनी सोडला आहे .

आमदार दयानंद सोपटे यांनी माहिती देताना अधिकाऱ्यांनाही महत्वाच्या   सुचना दिलेल्या आहेत ,सुरुच्या झाडाने पुन्हा हि जागा तयार करणार आहे . ,शिवाय स्थानिकांच्या समस्यांचा  सुचना घेवून कार्य करणार असल्याचे सांगितले .

तेरेखोल समुद्र किनारी भागात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात किनाऱ्याची धूप होवून परिसरातील सुरुंच्या बनाला धोका निर्माण होण्याबरोबरच अधिकाधिक किनाराही समुद्राच्या पाण्याने गिळकृत केला होता , गावालाही या पाण्याचा धोका होता , कॉंग्रेस सरकारचे दिगंबर कामत सरकार असताना केंद्रीय निधीतून या किनाऱ्याला संरक्षण भीत उभारण्यासाठी सुरुवातीच्या काळात १० कोटी रुपये खर्च केले त्यानंतर भाजपा सरकार आल्यानंतर सरकारी प्रक्रिया पूर्ण करून याच भिंतीवर आतापर्यंत 22 कोटी पेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे , आता हि भिंती धोकादायक बनली असून , लोकाना समुद्रात उतरण्यासाठी ज्या पायऱ्या उभारल्या होत्या त्या खालची वाळू पाण्यात घेल्याने पायऱ्याहि धोकादायक बनल्या आहेत , आजोबा गार्डन म्हणून चालण्यासाठी फुटपाथ केली होती तीही ठीक ठिकाणी कोसळलेली आहे , टेट्रापोड घातले होते तेही काही प्रमाणात समुद्राच्या पाण्यात वाहून गेले आहेत , किनारा आता धोकादायक ठरत आहे

किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज होत असते , पावसाळ्यात आणि भरतीच्या वेळी  या परिसराला धोका निर्माण होत असतो ,या किनाऱ्याला संरक्षण मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य . पार्सेकर यांनी विधानसभेत आवाज उठवून किनारी भागाला संरक्षण देण्याची मागणी केली होती , त्या नुसार मुखमंत्री दिगंबर कामात असतानाच्या त्यांच्या मर्जीतील एकाला या किनारी भागाचे सुरुवातीला सात कोटी रुपयांना कामाचा ठेका दिला होता , जाळीत दगड घालून संरक्षा देण्याचा प्रयज्ञ पहिल्याच पावसाने उधळून लावला होता , वापरलेले दगड आणि जाळी मोरजी .माद्रे , आश्वे , हरमल ,शिरोडा वेंगुर्ला या किनाऱ्यावर लागले होते , सुरुवातीला सात कोटी रुपये खर्च करून वाहून गेलेल्या कामाचे परत दुरुस्ती साठी आठ कोटी रुपये करच करण्यात आले , त्यानंतर परत या भिंतीचे टेट्रापोड वापर करून आधुनिक पद्धतीने या भिंतीवर अनेक कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे .केरी पंचायत क्षेत्रातील केरी फेरी धक्का ते आजोबा मंदिर पर्यंतच्या किनाऱ्याला संरक्षण देण्यासाठी जलसिंचन खात्या मार्फत केंद्रीय निधीचा वापर करून संरक्षण भिंत उभारली ठिकठिकाणी टेट्रापॅड घालून सुरक्षा देण्याचा प्रयाज्ञ केला ,स्थानिकांना समुद्रात किनारी उतरण्यासाठी पायऱ्या उभारल्या, सुरुवातीच्या काळात थोडी सुरक्षा मिळाली परंतु आता हळू हळू हि सुरक्षा धोक्यात आली आहे

या भिंतीचे दगडही किंनाऱ्यावर विखुरले असून येणाऱ्या पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे .त्यापूर्वी सरकारने या भिंतीवर लक्ष देवून उपाय योजना करावी अशी मागणी होत होती त्याची आमदार सोपटे यांनी गंभीर दखल घेऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: