सातारा 

सातारा जिल्ह्यात १०३ किलो जिलेटीनच्या कांड्या जप्त

सातारा (अभयकुमार देशमुख ) :

जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे गावात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे १०३ किलोच्या ८३६ जिलेटीन (gelatin) कांड्यासह एक चार चाकी गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी गोविंदसिंग राजपूत याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय स्फोटक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा विशेष शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तारळे गावात गोविंदसिंग राजपूत याच्या घराची आणि परिसराची तपासणी केली. तेव्हा राजपूत याच्या घराच्यामागे बंद शौचालयात चार बॉक्समध्ये जिलेटीनच्या (gelatin) कांड्या आढळून आल्या. त्याचप्रमाणे त्याच्या गाडीमध्येदेखील जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या प्रकरणी उब्रज पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

gelatin
जप्त करण्यात आलेली गाडी
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: