सातारा 

नाकाबंदीत १५ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ

सातारा ( महेश पवार) :
येथील शाहुपुरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे व डॉ दीपक थोरात, कस्तुरबा गांधी प्रा,आ.केंद्र सातारा याचे उपस्थित  करंजे नाका येथे विनाकारण फिरणार्याची कोरोना  (अँटीजन) टेस्ट  धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात १३५ जणांच्या टेस्ट केल्यानंतर १५ जण कोरोना पॉजिटीव्ह सापडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनाने कडक लॉक डाऊन ची घोषणा केली. आज सकाळपासून पोलीसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची कोवीड टेस्ट सुध्दा करताना दिसत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: