गोवा 

‘४८ तासांत राज्यातील सर्व सेवा पूर्ववत होतील’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले जनतेला आश्वस्त

पणजी :
राज्यभरात चक्री वादळामुळे विविध ठिकाणी सुमारे ५०० हून अधिक झाडे आणि १०० घरे पडली आहेत. तर दोन बळी गेले असून, येत्या ४८ तासांत राज्यातील सर्व सेवा पूर्ववत होऊ शकेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान, कोविड उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना या वादळाचा कसलाही फटका बसला नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, चक्रीवादळ गोव्याच्या 147 किमी अंतरावरुन गेलं. वादळाच्या पार्श्वभूमीवर आधीच सतर्कता बाळगली होती. वादळ जरी पुढं सरकलं असलं तरी पुढचे ४ दिवस महत्त्वाचे आहेत. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाचे आत्तापर्यंत राज्यात दोन बळी गेलेत. सुमारे 100 घरांना वादळाचा मोठा तडाखा बसलाय. बार्देश तालुक्यात 31 झाडं पडली, 17 घरांचं मोठं नुकसान झालं. सत्तरी, तिसवाडी, पेडण्यात मोठी पडझड झालीय. गोव्यात 500 पेक्षा जास्त जागी झाडं पडून मार्ग ठप्प झाले. 100 घरांचं किरकोळ नुकसान झालंय. गाड्यांचंही मोठं नुकसान झाल्याचंही समोर येतंय. घरांचं नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. मृतांच्या नातेवाईंकांनाही 8 दिवसांच्या आत मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्य रस्त्याव्यतिरीक्त ग्रामीण मार्ग बहुतांश ठिकाणी ठप्प असल्याचं सांगून ते म्हणाले, पाणी, वीज विभागाचं युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यातील नागरिकांनी संयम बाळगण्याची गरज आहे. जनजीवन सुरळीत व्हायला २ दिवस जाण्याची शक्यता असल्यामुळं लोकांनी सहकार्य करुन बचावकार्याला मदत करावी. मुरगावमध्ये सर्वाधिक 36 घरांचं नुकसान झालंय. पुढचे 8 दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं गरज नसताना घराबाहेर पडून नका.

ते म्हणाले, येत्या 48 तासांत सर्व सेवा पूर्व करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोविड मॅनेजमेन्ट करत असलेल्या रुग्णालयांना वादळाचा फटका नाही. जीएमसीचा 15 मिनिटं वीज पुरवठा खंडित झाला होता, पण तात्काळ सुरळीत करण्यात आला. प्रमुख मार्ग सुरळीत करण्याला आधी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: