Rashtramat

‘स्काय फाउंडेशन’ची आभाळाएवढी मदत

कल्याण :
कोरोना- लॉकडाऊनचे पाचवे सत्र आणि त्यासोबतच ओपनडाऊनचे पहिले सत्र देशभरात सुरु झाले असले तरी मुंबईसह कित्येक शहरांत मजुरांचे आणि गरिबांचे हाल सुरूच आहेत. शहरातून आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नात असलेल्या या मजूरांना मदतीचा हात देण्यासाठी विविध कंपन्या, सामाजिक संस्था आणि समाजसेवक पुढे येत आहेत. स्काय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्यावतीनेदेखील शामराव यादव, किरण मगर, स्मिता मर्टल, सुनील कालियन, डॉ. धुरंधर कटके हे लॉकडाऊनच्या पहिल्या सत्रापासून कल्याण ते मुलुंड या भागामध्ये अविरत मदत करत आहेत.
शामराव यादव हे स्वतः आरोग्यक्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच परिसरातील गोरगरिबांना भेटून त्यांच्यासाठी मोफत आरोग्यतपासणीची सोय केली. त्याचसोबत कोरोनाविषयी सतर्क केले. त्याचप्रमाणे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देत, त्यांचे मनोबल वाढवत आहेत. दुसरीकडे या भागातील आदिवासीपाड्यावरील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुरुवातीच्या दिवसापासूनच येथील पाड्यांवर विविध माध्यमातून रेशन पोहोचते करत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतून आपापल्या गावी पायी चालत जात असलेल्या मजूरांना श्यामराव यादव हे स्वतः भेटून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करत आहेत. आणि परिसरातील गरीबांना जीवनावश्यक अन्नधान्याची पॅकेट बनवून फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने घरपोच पाठवली जात आहेत. बैठ्या चाळी  आणि सोसायटीमध्ये फाउंडेशने मोठ्याप्रमाणात सॅनिटायझर्स आणि लिक्विड सोपचे वाटप केले आहे.

‘जगभरात या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे तर देशातील लाखो लोकांचा रोजगार एका क्षणात गेला. अशावेळी एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आणि तीच आपली संस्कृती आहे. आम्ही स्काय फाउंडेशनच्यावतीने जी काही थोडीबहुत मदत करू शकलो असू, तर ती याच भावनेतून आहे. आपण सगळे एका विचित्र काळातून जात आहोत. थोड्या दिवसात हे वातावरण निवळेल पण म्हणून आपले पूर्वीचे जगणे तसेच असेल, असे आपण म्हणू शकणार नाही. त्यामुळे या कठीण प्रसंगात आपण एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. या सगळ्या मदतीसाठी समाजातील अनेकांनी आम्हाला मोठ्या मनाने आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनीदेखील कोणतीही अपेक्षा न बाळगता अहोरात्र कष्ट घेतले. डॉक्टरांनी मदत केली, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. कारण मी किंवा आमची स्काय फाउंडेशनने जे काही केले आहे, त्यामागे पडद्यामागील सूत्रधार हेच सगळे आहेत.’ अशी भावना शामराव यादव यांनी यावेळी व्यक्त केली. 

हे वाचलंत का?

गोव्यात कोरोनाचा पहिला बळी

Rashtramat

गोव्यात शुक्रवार पासून लॉकडाऊन

Rashtramat

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

Rashtramat

Leave a Comment