Rashtramat

‘गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा’

पणजी :
अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गोवा-महाराष्ट्र हद्द सील करावी, अशी मागणी केली आहे. राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन करावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. 
गोव्यात ‘कोविड १९’ पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने आणि महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्यांमध्येच अधिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने पंतप्रधानांनी हस्तक्षेप करुन हद्द सील करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. राज्यात २०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. गोव्यासारख्या लहान राज्यात जेथे वैद्यकीय पायाभूत सुविधाही मर्यादित आहेत तेथे ही रुग्णसंख्या लक्षणीय आहे.आरोग्य क्षेत्रात काम करणाºयांना टेस्ट कीट तसेच अन्य संबंधित उपकरणे ताबडतोब पुरविली जावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मांगोरहिलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वास्कोत केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रेल्वेचे डबे (कोच) खाटा घालून ‘कोविड’ उपचारार्थ वापरता येतील का, हे पहावे असेही खंवटे यांनी सूचविले आहे. 

हे वाचलंत का?

‘आता विस्तारवादाचे जग संपले’

Rashtramat

‘गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

Rashtramat

ऑनलाईन करा ‘ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन’

Rashtramat

Leave a Comment