Rashtramat

‘गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

मडगाव :
गोव्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून स्थिती सरकारच्या हाताबाहेर जात असल्याने हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. गोवा फॉरवर्डनंतर आता आम आदमी पक्षानेही हीच मागणी केली आहे.
गोव्यात कोरोना बाधितांची संख्या 300 पेक्षा जास्त झाली असून केवळ वास्कोतच नव्हे तर गोव्यातील इतर भागातही रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सूत्रे हाती घ्यावीत अशी मागणी आपचे गोवा निमंत्रक एल्विस गोम्स यांनी केली. ते म्हणाले, राज्यपाल अनुभवी आहेत. आता त्यांनीच या दिशाहीन सरकारला दिशा दाखवावी.

बुधवारी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अशीच मागणी करताना कुचकामी मंत्रीमंडळाला कायमचे होम क्वारंटाईन करा अशी मागणी केली होती.आपचे गोम्स म्हणाले, सध्या गोव्यात सगळाच अनागोंदी कारभार चालू आले. राज्याचे शैक्षणीक धोरण पुढे कसे असेल याचा कुणालाही थांगपत्ता नाही. हे सरकार विध्यार्थ्यांचा प्रश्न कसा हताळणार असा सवाल त्यांनी केला.

हे वाचलंत का?

मडगाव न्यू मार्केट ८ दिवसांसाठी बंद

Rashtramat

‘गोव्यात समूह संसर्ग झालेला नाही’

Rashtramat

गोव्यात कोविडचा ९वा बळी

Rashtramat

Leave a Comment