Rashtramat

जुगार खेळल्यामुळे गाढव अटकेत

कराची :
पाकिस्तानमध्ये एका गाढवाची जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, या गाढवापेक्षा चर्चा आहे ती पोलिसांची. कारण, जुगार खेळल्यामुळे या गाढवाला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती, आज न्यायालयाने गाढवाला ४ दिवसांच्या अटकेनंतर सोडून दिले आहे. 
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागातील पोलिसांनी जुगार खेळण्याच्या आरोपाखाली आठ लोकांना आणि ज्या गाढवावर जुगार लावला गेला होता त्या, गाढवालाच अटक केली आहे. गाढवाला अटक केल्यानंतर चौकीबाहेर आणून बांधण्यात आले होते. हे गाढव ४० सेकंदात ६०० मीटर धावू शकेल का यावर जुगार लावण्यात आला होता. 

रहीम यार खान भागात जुगार खेळला जात होता. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आठ जणांसह एका गाढवाला अटक केली. शिवाय, एक लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त केली. अटक केलेले व्यक्ती गाढवांच्या शर्यतीवर पैसे लावत होते. पोलिसांनी कागदोपत्री आठ जणांसह गाढवालाही आरोपी बनवले आहे.’

हे वाचलंत का?

‘आपल्या मातृभाषेत प्राविण्य मिळवावे’

Rashtramat

मडगाव न्यू मार्केट ८ दिवसांसाठी बंद

Rashtramat

‘गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग’

Rashtramat

Leave a Comment