Rashtramat

‘आम्ही घेतोय केरळचे मार्गदर्शन’

मडगाव :
कोविड १९ वर मात करण्यात केरळचे उदाहरण हे अनुकरणीय असून, मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा टीचर यांच्या संपर्कात असून, त्यांच्याकडून गोव्यातील परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठीच्या आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना घेत आहे, त्यानुसार तपासणीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माध्यमांना मडगाव येथे सांगितले. 
दरम्यान, गोव्यात गेल्या २४ तासांत ४१ नवे कोविड १९ रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ४९०वर पोहोचला आहे. यामध्ये केपेतील दोन, मंगोर हिल येथील २९ रुग्णाचा समावेश आहे. तर ४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात अजून चार ठिकाणे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केली असून, यामध्ये कोरोना सदृश्य रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

हे वाचलंत का?

‘स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना द्या सरकारी नोकरी’

Rashtramat

अमित खानच्या कथा ऐका ‘कुकू’वर

Rashtramat

घर बसल्या घ्या ‘माऊंट मेरी’चे दर्शन

Rashtramat

Leave a Comment