Rashtramat

भारत- चीन तणाव : भारताचे २० जवान शहिद 

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव असताना मोठी माहिती समोर आली आहे. चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.
‘आम्ही घेतोय केरळचे मार्गदर्शन’

२० जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्करानेही दुजोरा दिला आहे. चकमकीत जखमी झालेले १७ जवानदेखील शहीद झाल्याने एकूण संख्या २० झाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं आहे.
​दरम्यान या चकमकीत चीनचंही नुकसान झालं आहे. चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून गंभीर जखमी झाले आहेत. सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या ४३ इतकी आहे. भारतीय लष्कराने मात्र याबाबत आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याचं म्हटलं आहे.​​

हे वाचलंत का?

गोव्यात कोरोनाचा पहिला बळी

Rashtramat

अभिषेकही कोरोना पॉझिटिव्ह

Rashtramat

‘रमेश घाडींची कविता इथल्या मातीत रुजलेली’

Rashtramat

Leave a Comment