Rashtramat

माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन


पणजी : 
माजी उपसभापती आणि माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन झाले ते 92 वर्षांचे होते गोवा मुक्तीनंतर स्थापन झालेल्या पहिल्या विधानसभेत ते प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. त्याचप्रमाणे 1967 झाली सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा निवडून येऊन तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब कथा दयानंद बांदोडकर यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. काही काळ त्यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती म्हणूनही कामकाज पाहिले. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे ते वडील होत.

अच्युत उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. प्रतापसिंग राणे, गोपाळराव मयेकर, रमाकांत खलप, स्व जयसिंगराव राणे आदींचे राजकारणातील सहकारी म्हणून उसगावकर यांनी काम केले. बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होतील.

हे वाचलंत का?

…अखेर ‘पबजी’चा खेळ खल्लास

Rashtramat

कोंकणी भाशा मंडळाचे पुरस्कार जाहीर

Rashtramat

कुख्यात गुंड विकास दुबे चकमकीत ठार 

Rashtramat

Leave a Comment