Rashtramat

राजनैतिक सुत्रपाताची सुरुवात…!

सायली पावसकर 

आज संपूर्ण विश्वासमोर निसर्गात केलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम स्वरूप ‘कोरोना’ ही आपत्ती उभी ठाकली आहे. आजच्या गंभीर परिस्थितीमुळे समाजाचा, मानवी स्वभावाचा आणि व्यवस्थेचा खरा चेहरा समोर आला आहे, ही अशी स्थिती सहसा उघड उघड समोर येत नाही आणि संपूर्ण जगाच्या इतिहासातील ( माझ्या आयुष्यात निदान मी पाहिली व अनुभवलेली ) ही पहिली घटना आहे. जिथे सत्ता, संविधान, व्यवस्था, सामाजिक अवस्था, प्रवृत्ती याचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. या आपत्तीने विश्वात एकूणच मोठे आर्थिक, सामाजिक, राजनैतिक आणि मनोवैज्ञानिक पडसाद उमटत आहेत. ही आपत्ती कोणताच भेद न करता प्रत्येकाला भेडसावत आहे. जीवनाला वाचवण्यासाठीचा संघर्ष प्रत्येकाचा निर्वाकर सुरू आहे. उद्भवलेल्या आपत्तीमुळे समाजातील प्रत्येकजण जबाबदारीने वागत आहे. आरोग्य कर्मचारी जीवनाला वाचवण्यासाठी कार्यरत आहे. सेवाभावी संस्था गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर आहेत. पण मानवी मूलभूत अधिकारांसाठी कोण लढतंय ? उद्भवलेल्या स्थितीच्या मुळाशी कोण जात आहे ? त्याला तटस्थपणे कोण विश्लेषित करत आहे ? उद्भवलेल्या आपत्तीतून पुन्हा पूर्ववत होण्यासाठी खरी कसब लागते. आज कितीही पैसा किंवा सुखवस्तू स्थितीत आपण असलो तरी, आरोग्यसेवा आणि कल्याणकारी राज्यसंस्था ही मौल्यवान संसाधने आहेत व त्यांची अनिवार्यता अशा आपत्तीच्या काळात सिद्ध होते.
अशा काळात कलाकार , रचनाकार, नाटककार आणि साहित्यिक यांची मुख्य व विषेश भूमिका येते, जिथे ते आपल्या कलेला माध्यम बनवतील व आपल्या साहित्याच्या रचनेतून हेतुपूर्वक मूलभूत प्रश्न , मौलिक अधिकार आणि उद्दीष्टांना मांडतील. कलासत्वाला मानवतेसाठी व विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत विचार म्हणून काळासोबत लढतो. हीच भूमिका घेतली रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी.

१८ जून: शेतकरी पारतंत्र्य दिन

मजुरांच्यासोबत चाललेल्या जीवघेण्या प्रकरणाबद्दल आज सहानुभूती वाटते आहे. आजच्या स्थितीत ही, मजुरांचे मुद्दे, प्रश्न विकासाच्या बासनात गुंडाळलेले आहेत.आधीच मजुरांची ही अवस्था, त्यात त्यांच्या मौलिक अधिकारांचे हनन, यातून स्पष्ट होते की, मजुरांचे यंत्रणेतील स्थान काय ? हा रोग उच्च व मध्यमवर्गातून शोषित -गरीब वर्गांत पसरला हे सत्य नाकारता येणार नाही. तरीही फरपट मजुरांची, गरिबांची होत आहे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की, नवउदारमतवादी यंत्रणेत, राजकीय परिघात आणि समाजात मजुरांसाठी काही संवेदना उरल्या नाहीत. कारण  राजकीय कोष असूनही मजूर सहकारी पायी चालत जाण्यास विवश आहेत. धान्य कोठारे भरलेली असूनही उपासमार व भूकबळी जात आहेत. जागीतकीकरणाचे हे विदारक सत्य आहे. 
जिथे थाळ्या बडवून, दिवे पेटवून मध्यमवर्ग समाजाने मान्य केले होते की आता सगळे पुर्ववत होईल , तिथे सरकारला मजुरांनी हादरवून सोडले . उत्तरदायित्व स्वीकारण्यास भाग पाडले. मजुरांच्या सत्याग्रहाने जीवन संघर्षाची मशाल पेटवली.मृतावस्थेत असलेल्या लोकशाहीला जिवंत केले. आज त्यांनी आपल्या विवशतेला अस्त्र केले आहे, मृत्यूसोबत लढा देत आहेत. जगण्यासाठी, मानवतेला जगविण्यासाठी ! 

अंतिम व्यक्ति लोकतंत्र की लड़ाई लड़ रहा है! 
भारतीय समाज और व्यवस्था का
अंतिम व्यक्ति चल रहा है
वो रहमो करम पर नहीं
अपने श्रम पर ज़िंदा रहना चाहता है
यह अंतिम व्यक्ति लोकतंत्र के लिए
लड़ रहा है
यह गांधी की तरह
अपनी विवशता को अपना हथियार बना रहा है
शायद गांधी को पहले से पता था
उसके लोकतंत्र और विवेक का
वारिसदार अंतिम व्यक्ति होगा !

गांधींनी म्हंटले होते, खेड्यांकडे चला ! हे गांधींचे वाक्य आज मजूर सार्थक करत आहेत. देशाची खरी प्रगती ही ग्रामीण विकासाच्या जोरावर होईल हा गांधींचा विचार. मजुरांच्या या सत्याग्रहाने आत्मनिर्भरतेचे खरे मूळ हे गावांमध्ये आहे हे निदर्शनास आणून दिले. ( म्हणूनच सगळे संकटसमयी गावांकडे निघालेत ). गावांमध्ये शाश्वत विकासाची पाळंमुळं रुजवली असती तर मजुरांना आपली गावे, घरे व परिवार सोडून परजीवी शहरांत येण्याची आवश्यकताच नव्हती. 
वरील कवितेची रचना त्याच अंतिम व्यक्ती बद्दल आहे, जो गांधीचा शेवटचा (तळागाळातील ) व्यक्ती, कार्ल मार्क्सचा सर्वहारा आणि आंबेडकरांचा शोषित व्यक्ती आहे. गांधींनी याच शेवटच्या व्यक्तीला राजनैतिक प्रक्रियेसोबत जोडले होते व भारतीय लोकशाहीला सुदृढ केले होते. आंबेडकरांनी शोषितांच्या अन्यायाला भेदले. जन्माच्या संयोगाला आव्हान दिले व  यंत्रणेत सहभागी होण्याचा समान हक्क मिळवून दिला. कार्लमार्क्सने वर्गसंघर्षाची चौकट मोडून सर्वहाराची सत्ता स्थापन करण्याचे सूत्र दिले.
आजच्या काळात जिथे बाजारवाद , जागतिकीकरण लोकतंत्राच्या मूल्यांना ध्वस्त करत आहे, जिथे समाज संवेदनहीन होऊन टाळ्या व थाळ्या बडवत आहे, जिथे लोकप्रतिनिधी मूलभूत, कल्याणकारी सेवांच्या पूर्ततेऐवजी केवळ घोषणाबाजी करत आहे तिथे मजूर प्रतिरोध करीत, गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर चालत आहेत. याच विचाराला मांडत रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या सारखे रचनाकार आपल्या रचनेतून न्याय , समता, समानतेचे मूल्य रुजवून नवीन राजनैतिक सुत्रपात प्रस्थापित करीत आहेत.  
या मुद्याचे इथे आवर्जून विश्लेषण व्हावे , ज्या मजुरांच्या नावे आज कित्तीतरी मजदूर संघटना व कामगार संघटना उभ्या राहिल्या आहेत, त्या मजुरांच्यात ही दृष्टी का नाही जागवू शकले आणि त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव का नाही करून दिली.
संघटना किंवा युनियन मालकांशी व सरकार सोबत लढते. मजदुर संघटना पेन्शन व हक्क यासाठी भांडते. पायी चालत जाण्याचा हा मजदूर सत्याग्रह कोणी पेटवला नाही.घराकडे जाण्याची त्यांची प्रतिबद्धता ही स्वतःच्या असण्याची व सुरक्षिततेची प्राथमिकता होती. त्यासाठीच हे मजूर  कुठल्याही आंदोलना शिवाय , मोर्चा शिवाय संघटित झाले.
भारत आत्मनिर्भर होता जेव्हा आपली गावे समृद्ध होती. गावातील शेतकरी आजही जगाचा पोशिंदा आहे. राजनैतिक वर्चस्ववादाने, आपल्या विकासाला विकण्यासाठी नवउदारमतवादी विचाराने शहरांना निर्माण केले. परजीवी शहरांनी जागतिकीकरणाची बाजारपेठ कवेत घेतली. आजही आपली गावं स्वावलंबी आहेत. आपले सत्ताधीश ज्या आत्मनिर्भरतेची गोष्ट करत आहेत. त्याची पोकळता व घोषणाबाजी ची निरर्थकता दर्शवणाऱ्या या काव्यरचना आहेत.

मी मागील दिवसांपासून व्यवस्थेला लागलेला सुरुंग अनुभवतेय, कोरोना सोबत आपण सारेच उत्कट भावनेने अथक प्रयत्नाने लढत आहोत. पण कोरोना पेक्षा भूक – भीती , भ्रम आणि मूळ मुद्यांवर भर देण्याऐवजी दिशा बदलण्याचे अनेक प्रयास प्रकर्षाने समोर येत आहेत. सत्य नेहमी कटू असते म्हणून सत्याला प्रश्नांच्या स्वरूपात मांडावे लागते,जे आजच्या घडीला गरजेचे आहे. आज व्यवस्थेमध्ये असलेल्या पोकळीचे प्रश्न मांडणे आवश्यक आहेत, कारण हे प्रश्न आता नाही सोडवले तर अजून भीषण स्वरूपात समोर येतील. म्हणूनच माझ्यासाठी या प्रश्नांना सामोरे खूप सकारात्मक आहे. या काव्य रचनांतून कवी आपणा सर्वांना विचारतो आहे की हे प्रश्न, वास्तव, न्याय व समतेच्या कलात्मक रंगकर्मात, मजुरांच्या संघर्षात आपण कुठे आहोत ? रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी आपल्या काव्य रचनांतुन पायी चालत जाणाऱ्या मजुरांनी आपल्या संघर्षाच्या कृतीतून अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्याच प्रश्नांच्या माध्यमातून व्यवस्थेला जागं करण्याचे काम ते पदोपदी करत आहेत. 
पायी चालणाऱ्या या मजुरांनी बुद्धिजीवी – पुरोगाम्यांच्या गुर्मीला धाराशाई केले. नैतिक – सभ्य, सुसंस्कृत समाजाला जाणीव करून दिली मानवी संवेदनांची, मृत समाजाचा आत्मा जागा केला.घराच्या पिंजऱ्यात अडकलेल्या मनुष्याला मनुष्य असण्याची जाणीव करून दिली. याने हे निश्चित झाले की, या कवीच्या काव्य रचनांनी राजनैतिक सुत्रपात प्रस्थापित केले आहे. त्यावर आज समाज मार्गस्थ आहे. मजुरांच्या जीवन संघर्षाला पाहण्याची दृष्टी बदलली. या कवीच्या रचनेतून आज देश पेटला आहे, राजकीय परिघात यांच्या क्रांतिकारक काव्य रचनांवर चर्चात्मक संवाद घडत आहे. मजूर संघटना व त्यांचे प्रतिनिधी या काव्यरचनातून आपले राजकीय धरातल विश्लेषित करीत आहेत. नाटककार – कलाकार प्रत्यक्षात मजुरांच्या प्रश्नांवर काय मार्ग काढावा यावर संवाद साधत आहेत. संपादक व पत्रकार मजुरांच्या मुद्यांना अग्रणी धरत आहेत. राजनैतिक कार्यकर्ते लोकशाहीची संकल्पना मांडताना या कवितांचा आधाराने संवाद सुरू करत आहेत. आधाराने संवाद सुरू करत आहेत.थोडक्यात जड झालेल्या समाजाचा स्टेट (मानसिकता ) ब्रेक झाला.
रंगकर्म , कला आणि राजनीती यांचा थेट संबंध आहे. मूलतः कला व कलाकार विद्रोही असतात. रंगकर्म हे मौलिक रित्या राजनैतिक कर्म आहे. इथे कवीने रचनाकाराची / नाटककाराची भूमिका स्पष्ट केली आहे.रंगकर्मसत्याग्रह आहे, सत्तेविरुद्ध प्रतिरोध आहे.विचारांना उद्वेलीत करण्यासाठी,अहिंसक मार्गाने केलेला सत्याग्रह जसे आजच्या घडीला मजूर करीत आहेत.राज्यव्यवस्था नीती – नियम बनवते व कला माणसाला माणूस बनवते. रंगकर्मी , रचनाकार, साहित्यकार सत्तेने दिलेल्या अवधारणांना स्वीकारतात व रंगदृष्टी अवधारणांना  मोडते.रंगकर्मचे दायित्व काय आहे, याची भूमिका या काव्यरचनेत आहे. 
ज्यांना रंगाचा अर्थ, मर्म आणि अभिव्यक्ती चे कर्म समजते तेच “रंगकर्मी” असतात.. विवेक, समग्रता, शोषितांची पक्षधरता.. विकारांवर विचारांचा विजय.. ही जीवन दृष्टि आहे… जेव्हा जीवन दृष्टी ‘रंगा’ ला ‘कर्मा’ ने आलौकित करते तेव्हा कलात्मक संवेदनांपासून निर्माण होते समता व न्यायाची दृष्टी ! असे  मंजुल भारद्वाज नोंदवतात.
बाहेरील शत्रूला धारातीर्थी करणारे, सीमेवर आपल्या रक्ताची आहुती देणारे सैनिक व रक्तबंबाळ पावलांनी भारतीय लोकशाहीला बळकट करणारे, देशातील शत्रूला देशहिताचा पाठ पडवणारे, दमनकारी सत्तेला भिडणारे मजूर हे एकसमान आहेत. ही दृष्टी देणारी रचना.

कोरोनाच्या आकड्यांचा खेळ

सरहद पर सैनिक और सड़क पर चलता मज़दूर
क्या बर्फ़ में पिघलते गलते
सैनिकों को भी लाचार
विवश, विचार हीन,
मज़बूर बताने की हिम्मत करेगें?
या
देशभक्ति में उनके
संघर्ष,साहस,वीरता का
वीर रस में गुणगान करेंगे
क्योंकि वो सरहद पर
दुश्मन से लड़ते हैं
परदेश के अंदर
देश की सत्ता पर बैठे
संविधान और लोकतंत्र के विध्वंसक से
संघर्ष करनेवाले मज़दूर
बदहवास हैं
लाचार हैं
विचारहीन हैं
क्यों ?
 
भारतीय लोकशाही आणि राजनैतिक परिप्रेक्ष्यात या कवीच्या काव्यरचना एक खोलवर प्रभाव सोडत आहेत. ज्याने संविधानाची मूळ अजून भक्कम होतील हे निश्चित.
परिवर्तनासाठी एक वैचारिक ठिणगीची आवश्यकता असते. ही वैचारिक ठिणगी “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांत गेल्या 28 वर्षांपासून जनमानसात पेटवत आहे. हो, आम्हा रंगकर्मींचा हा दृढ विश्वास आणि संकल्प आहे की अश्या ज्वलंत रचनांमधून सांस्कृतिक चैतन्य जागवत सांस्कृतिक क्रांती चा नक्कीच उदय होईल !

(लेखिका मंजुल भारद्वाज यांच्या ‘थिएटर फॉर रिलेवंस’मध्ये रंगकर्मी आहे. )


हे वाचलंत का?

कोंकणी भाशा मंडळाचे पुरस्कार जाहीर

Rashtramat

कोंकणी अकादेमीच्या उपाध्यक्षपदी कांता गावडे

Rashtramat

सुशांत : व्यवस्थेचा बळी 

Rashtramat

1 comment

आशिष आडिवरेकर June 23, 2020 at 8:30 pm

तुम्ही खूप छान लिहिता ,असचं लिहीत राहा.😊

Reply

Leave a Comment