Rashtramat

‘स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना द्या सरकारी नोकरी’

मडगाव :
आपण ७५ वा गोवा क्रांती दिन साजरा करीत असताना, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा  सरकारी नोकरी मिळवुन देण्याचा प्रश्न कायमचा सोडवणे गरजेचे आहे. सन २०२०-२०२१ वर्षात सरकारने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या  सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यानी लोहिया मैदानावर डाॅ. राम मनोहर लोहिया व हुतात्मा स्मारकाला आदरांजली अर्पण केल्यानंतर बोलताना केली. 
१४५० खलाश्यांसह जहाज पोहोचले गोव्यात

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच आज आपल्याला हे दिवस बघण्याचे भाग्य मिळाले असे सांगुन, दिगंबर कामत यांनी येत्या वर्षी गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षात पदार्पण करण्याच्या आधीच सर्व स्वातंत्र्यसैनीक व त्यांच्या कुटूंबियांच्या तोंडावर हास्य फुलविणे आपले कर्तव्य असल्याचे सांगीतले व त्यांना कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडविण्याचे आवाहन सरकारला केले. 

हे वाचलंत का?

‘रमेश घाडींची कविता इथल्या मातीत रुजलेली’

Rashtramat

‘हा पुरस्कार माझ्या तत्वात बसत नाही’

Rashtramat

‘व्हिसलिंग वूड्स’च्या ऑनलाईन परीक्षा ‘या’ दिवशी  

Rashtramat

Leave a Comment