Rashtramat

गोव्यात कोरोनाचा पहिला बळी

पणजी :
राज्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षे वयाच्या कोरोनाबाधित रुग्णाचं मडगावातल्या कोविड रुग्णालयात सोमवारी पहाटे निधन झालं.  गोव्यात कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच आयसीयूत हलवण्यात आले होते. रविवारी त्याची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांचे पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली.


दीड महिन्यापूर्वी ग्रीन झोन असलेल्या गोव्यात आज कोविड रुग्णालयात आणि कोविड निगा केंद्रात मिळून ६८२ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत एकूण १३५ कोविड बाधित बरे झाले आहेत.

हे वाचलंत का?

‘राम मंदिर अनंत काळ मानवाला प्रेरणा देईल’

Rashtramat

विद्यार्थ्यांना भाशा मंडळाचा ऑनलाईन आधार  

Rashtramat

घर बसल्या घ्या ‘माऊंट मेरी’चे दर्शन

Rashtramat

Leave a Comment