Rashtramat

सुधा मूर्ती यांची पुस्तके आता कोंकणीतही…

पणजी :
प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती ‘हियर, देयर अँड एव्हरीव्हेयर’ आणि ‘थ्री थावजंड स्टिचीस’ हि सर्वदूर गाजलेली पुस्तके आता कोंकणी वाचकांनादेखील वाचता येणार असून, सुनेत्रा जोग यांनी हि दोन्ही पुस्तके कोंकणीमध्ये अनुवादित केली आहेत. गोवा १५५६ प्रकाशन संस्थेच्यावतीने नुकतीच हि दोन्ही अनुक्रमे ‘हांगा, थंय आनी वाचत थंय’ व ती’न हजार टांके’ या नावाने पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या सुद्धा मूर्ती या सिद्धहस्त लेखिकादेखील आहेत. त्यांच्या ‘ थ्री थावजंड स्टिचीस’ या पुस्तकाचे वर्णन ‘भारतातील सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या महिला लेखिकेच्या ‘धैर्य आणि श्रद्धा यांची हृदयस्पर्शी कहाणी’ असे केले गेले आहे. तर त्यांच्या हिअर, देअर अँड एव्हरीव्हेअर या पुस्तकातून सुधा मूर्ती – काल्पनिक कथा,  मुलांची पुस्तके, प्रवासवर्णने आणि तांत्रिक पुस्तके असे विविध प्रकार आणि भाषा, त्यांना भावलेल्या विविध संग्रहातील जुन्या आणि काही नव्या कथांचा समावेश केला आहे.

अनुवादिका सुनेत्रा जोग यांनी याआधी त्यांनी सुधा मूर्ती यांच्या पाच पुस्तकांचे कोकणीत भाषांतर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मालती राव यांच्या डिसऑर्डरली वुमन या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे भाषांतर कोकणीमध्ये केले आहे. प्रिया छाब्रिया यांच्या जनरेशन 14 चे आणि शिव खेरा यांच्या यू कॅन अचिव्ह मोअरचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे.
हि दोन्ही पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली असून,  पणजीत वर्षा बुकस्टॉल, ब्रॉडवे बुक हाऊस(पणजी), गोवा कोंकणी अकादमी व इतर दुकानांत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. यातील ‘हांगा, थंय आनी वाचत थंय’ या पुस्तकांवरील सुधा मूर्ती यांची चित्र रोहन पै धुंगट यांनी रेखाटले आहे.

हे वाचलंत का?

‘या’ देशात होणार ‘आयपीएल २०२०’

Rashtramat

‘स्काय फाऊंडेशन’ वाढवतेय पोलिसांचे मनोबल

Rashtramat

माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन 

Rashtramat

Leave a Comment