Rashtramat

ऑनलाईन करा ‘ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन’

पणजी :
भारतासारख्या देशात योग नेहमीच समाजाचा महत्वाचा भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह विविध फायद्यांसाठी जगभरात योगाचा अढळ अभ्यास केला जातो. सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे ज्यामुळे तणाव आणि ताण देखील वैयक्तिक पातळीवर आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत, योगाच्या मदतीने आपण अशा वेळी शांत आणि संयमित राहण्याचा प्रयत्न करायला हवा.  या हेतूने, आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सामाजिक हिताच्या दृष्टीने ऑनलाईन ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन कार्यशाळा आयोजित करीत आहे.गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर २ ते ५ जुलै या कालावधीत ऑनलाईन ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी दोन तास आणि रविवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे वर्ग श्री श्री रविशंकर घेणार आहेत. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेब पोर्टल https://www.artofliving.org/in-en/goa येथे नोंदणी करता येणार आहे. 

‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

सुदर्शन क्रिया हा या वेबकार्यशाळेचा मुख्य घटक आहे, ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते, तणाव त्वरित आणि प्रभावीरित्या कमी होतो, तीव्र विश्रांती आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, लक्ष केंद्रित करण्यास तसेच स्मरणशक्ती आणि निरोगी आरोग्य प्राप्त करण्यास मदत होते. हे तंत्र आपली मानसिक स्थिती सुधारण्यास तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करते. यावर झालेल्या स्वतंत्र संशोधनात यामुळे तणाव संप्रेरकातील घट होत असल्याचे सिद्ध झाले आहे. 
या कार्यशाळेला सुरळीतपणा आणण्यासाठी अनिता रायकर या हि कार्यशाळा मोइरा येथून आणि संतोष घोडगे आणि संगीता हेगडे हे मडगावमधून, मिथीली काकोडकर आणि स्वर्ण लक्ष्मी हे साशष्टीमधून आणि, पूर्वा परब आणि नीला नावेलकर हे पणजीमधून आणि स्वाती बुवाजी या केपेमधून कार्यरत राहणार आहेत. 
नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर कॉल करा 9822104421 किंवा http://aolc.in/475612 or https://www.artofliving.org/in-en/goa येथे नोंदणी करा.

हे वाचलंत का?

गोव्यात कोविड मृतांची संख्या ३९

Rashtramat

9 ऑगस्टपासून किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर

Rashtramat

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

Rashtramat

Leave a Comment