Rashtramat

‘एन एक्स्ट्राऑर्डनरी लाइफ’ला ‘एक्स्ट्राऑर्डनरी’ प्रतिसाद

पणजी :
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आयुष्याचा आणि एकूण कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे ‘ ‘एन एक्स्ट्राऑर्डनरी लाइफ, बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रीकर’ हे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्रसिद्ध गोमंतकीय पत्रकार सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेकर यांनी लिहिलेले हे पुस्तक पेंग्वीन इंडियाने प्रकाशित केले आहे. लॉकडाऊन असतानाही या पुस्तकाला वाचकांकडून सध्या चांगला प्रतिसाद लाभत आहे.
सर्वसामान्य संघ स्वयंसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री हा अतुलनीय प्रवास साकारणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाचा सर्वागीण आढावा या पुस्तकात प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला  आहे. लेखक सद्गुरू पाटील यांनी सांगितल्यानुसार, या पुस्तकातील तपशिलासाठी आणि त्याच्या सत्यतेसाठी त्यांनी पर्रीकर यांच्या आप्तस्वकीयांची भेट घेऊन, त्यांच्याकडून विविध बाबींची खातरजमा केली आहे. यामुळे या पुस्तकातील मजकूर हा सत्याधारित आणि विवादरहित आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्यासाठी आणि देशासाठीही नेहमीच आकर्षण बिंदू ठरले होते. त्यामुळेच गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याचे प्रतिनिधित्व करतानाही त्यांना नेहमीच राष्ट्रीयस्थान मिळत होते. त्याचप्रमाणे पुढे ते देशाचे सरंक्षण मंत्रीदेखील झाले. त्यानंतर ते स्वखुशीने त्या पदावरून पायउतार होत पुन्हा एकदा त्रिशंकू गोव्याचे राज्यशकट हाकू लागले. हा सगळं नजीकचा इतिहास आणि त्यासोबतच पर्रीकर यांच्या वैयक्तिक आयुष्याचा पट या पुस्तकात तपशीलवार मांडण्यात आला आहे.


साहित्यिक ‘टिंबां’ची मर्मग्राही गोष्ट
 


सद्गुरू पाटील यांनी यापूर्वीच ‘गोवा, राजकारण आणि पर्रीकर’ या पुस्तकातून गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून मनोहर पर्रीकर यांचा प्रवास रेखाटणारे पुस्तक सहित प्रकाशनच्यावतीने गेल्यावर्षी प्रकाशित झाले होते. त्यालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. पर्रीकरांवरील हि दोन्ही पुस्तके आता गोव्यातील सर्व प्रमुख पुस्तक विक्री दुकानात उपलब्ध आहेत.  

हे वाचलंत का?

राजनैतिक सुत्रपाताची सुरुवात…!

Rashtramat

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

Rashtramat

वरवरा राव यांची प्रकृती खालावली

Rashtramat

Leave a Comment