Rashtramat

सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन 

मुंबई:
सुप्रसिद्ध  अक्षर सुलेखनकार कमल शेडगे यांचं आज मुंबईतील राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे. मुलुंड येथे आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाइम्स ऑफ इंडियात नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले. १९६२ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा ‘लेटरिंग’ केलं. पुढे  मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच गं घुमा, ज्वालामुखी, गुलमोहर अशी हजारांहून अधिक नाटके रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमल शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता. फिल्मफेअर आणि माधुरी या मासिकांसाठी त्यांनी ‘लेटरिंग’ केलं होतं.

हे वाचलंत का?

‘स्काय फाउंडेशन’ची आभाळाएवढी मदत

Rashtramat

9 ऑगस्टपासून किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर

Rashtramat

सुशांत : व्यवस्थेचा बळी 

Rashtramat

Leave a Comment