Rashtramat

‘रमेश घाडींची कविता इथल्या मातीत रुजलेली’

पणजी :
रमेश घाडी यांची कविता ही गोमंतकीय मातीचा सुगंध घेऊन आलेली असून, त्यांचे शब्द हे सर्वार्थाने इथल्या मातीशी लगडलेले आहेत. ‘आवय जाल्या जाणटी’ या काव्यसंग्रहातील कवितादेखील याला अपवाद नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्र-शिल्पकार सुबोध केरकर यांनी केले. प्रसिध्द कवी रमेश साजू घाडी यांच्या ‘आवय जाल्या जाणटी’ या पहिल्यावहिल्या कोंकणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन ’मोग’ येथे केल्यानंतर ते बोलत होते.
‘मोग’ संग्रहालयात झालेल्या या छोटेखानी आणि अनौपचारिक प्रकाशन कार्यक्रमामध्ये मोगचे संचालक आणि प्रसिध्द चित्र-शिल्पकार सुबोध केरकर यांच्यासह रमेश घाडी यांची व त्यांच्या कुटूंबियाची उपस्थिती होती.

‘आवय जाल्या जाणटी’ या संग्रहाला डॉ. भूषण भावे यांची प्रस्तावना असून, विकासाच्या ओघात आपले अधिष्ठान गमावून बसलेल्या गोव्याविषयीची तळमळ आणि अनुकंपा यांचा प्रामुख्याने या काव्यसंग्रहामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले.

हे वाचलंत का?

कोरोनाचा दिवसात तिसरा बळी

Rashtramat

गोव्यात कोविड मृतांची संख्या ३९

Rashtramat

‘गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग’

Rashtramat

Leave a Comment