Rashtramat

गोव्यातील रस्ते झाले निर्मनुष्य 

पणजी :
कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक होत असलेली वाढ लक्षात घेत, राज्यात पुन्हा एकदा आजपासून तीन दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाऊनला नागरिकांनी सक्रिय प्रतिसाद दिला असून, राज्यातील सगळे रस्ते आज निर्मनुष्य दिसत होते. बाजारपेठा पूर्णत: बंदच राहिल्या.
जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, दूध विक्री, औषधालयें, वर्तमानपत्रांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. लोकांना दुध, पाव वगैरे वस्तू सकाळी उपलब्ध झाल्या. औद्योगिक वसाहतींमधील कारखानेही वगळण्यात आले होते. लॉकडाऊन उल्लंघनांबाबत तशी फारशी मोठी प्रकरणे घडलेली नाहीत.  कदंब महामंडळानेही बसगाड्या बंद ठेवल्या. एरव्ही कदंबच्या ५२४ पैकी १७८ बसगाड्या वाहतूक करीत असत. खाजगी बसेसही पूर्णपणे बंद होत्या. 

हे वाचलंत का?

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

Rashtramat

अभिषेकही कोरोना पॉझिटिव्ह

Rashtramat

‘एन एक्स्ट्राऑर्डनरी लाइफ’ला ‘एक्स्ट्राऑर्डनरी’ प्रतिसाद

Rashtramat

Leave a Comment