Rashtramat

मडगाव न्यू मार्केट ८ दिवसांसाठी बंद

पणजी :
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढत्या संख्या लक्षात घेत राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगावमधील न्यू मार्केट उद्यापासून पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी सर्वसंमतीने घेतला आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास सर्वजण आपापल्या पद्धतीने सहकार्य करत असून, बाजारपेठा सुरु राहिल्यास रोगप्रसार वाढू शकतो हि भीती असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवार, २० ते मंगळवार २८ जुलै दरम्यान न्यू मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यात शुक्रवार पासून लॉकडाऊन

दरम्यान, राज्यात गेले ३ दिवस सुरु असलेला लॉकडाऊन आज रात्री १२ वाजता संपुष्टात येणार असून, राज्यात सुरु असलेला जनता कर्फ्यू मात्र १०  ऑगस्टपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ वाजेतो कायम राहणार आहे. तसेच मुरगाव तालुक्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला असून, हा लॉकडाऊन २४ जुलै रोजी सकाळी ६ पर्यंत असणार आहे.

हे वाचलंत का?

‘आम्ही घेतोय केरळचे मार्गदर्शन’

Rashtramat

#corona: माजी सैनिकांची वाहतूक सेवा

Rashtramat

‘गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा’

Rashtramat

Leave a Comment