Rashtramat

कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू


पणजी :
राज्यातील कोविड-१९ प्रसाराला अटकाव करण्याचे सगळे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे कोविडमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. काल एका २९ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतल्यानंतर आज सकाळीच दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही रुग्णांचे वय ६५ आल्याचे सांगण्यात आले. या दोघांसह राज्यातील कोरोनाबळीचा आकडा आता २५ झाला आहे.
कोरोना रुग्णालयात आयसीयुमध्ये असलेल्या एका ६५ वर्षीय रुग्णाचा सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला असून, गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या ६५ वर्षीय महिला रुग्णाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. दरम्यान, रात्री ८ ते सकाळी ६ वाजेतो राज्यात जनता कर्फ्यू सुरूच आहे. 

हे वाचलंत का?

‘आम्ही घेतोय केरळचे मार्गदर्शन’

Rashtramat

सचिन पायलट यांना पदांवरून काँग्रेसने हटवले

Rashtramat

सोमवारपासून सुरु होणार रेस्टॉरंट्स

Rashtramat

Leave a Comment