Rashtramat

‘पक्षांनी केला भारतीय आकाशात प्रवेश… ‘

नवी दिल्ली : 
‘मिडियम मल्टी-रोल’लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीतील पाच राफेल विमाने आज अंबाला हवाईतळावर दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्टिटरच्या माध्यमातून राफेलचे स्वागत केले. ‘पक्षांनी भारतीय आकाशक्षेत्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे… हॅपी लँडिंग अंबाला!’ असे ट्विट त्यांनी यावेळी केले. 
राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाने राफेल अतिशय व्यावसायिकपणे चालविल्याबद्दल दलाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘‘17 स्क्वाड्रन, गोल्डन अॅरो यापुढेही अशाच पद्धतीने आपले ब्रीदवाक्य -‘‘ उदयम् अजस्त्रम’’ याप्रमाणे कार्यरत राहतील, याची आपल्याला खात्री आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमतेला अगदी योग्यवेळी चालना मिळत आहे, दल अधिक सुद्ढ होत आहे, याचा मला अतिशय आनंद झाला आहे. ‘‘राफेल लढावू विमानांचे भारत भूमीवर उतरणे, हा आमच्या लष्कराच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा असून नवीन युगाचा प्रारंभ दर्शवत आहे. बहुउद्देशीय भूमिका निभावणा-या राफेल लढावू विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडून येणार आहे.’’ असेही राजनाथ यांनी आणखी एका व्टिटमध्ये म्हटले आहे.
राफेल लढावू विमानाची क्षमता अधोरेखित करताना राजनाथ यांनी म्हटले आहे की,‘‘या विमानांची उड्डाणाची कामगिरी उत्कृष्ट आहे. तसेच विमानाव्दारे वापरण्यात येणारी शस्त्रे, रडार यंत्रणा आणि इतर सेन्सर तसेच इलेक्ट्रॉनिक युद्ध कौशल्य क्षमता जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते. राफेलचे भारतामध्ये  आगमन झाल्यामुळे देशाला कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न झाल्यास तो टाळता यावा, हल्ला परतवून लावण्याच्यादृष्टीने हवाई दलाला अधिक बळकटी आली आहे.’’

हवाई दलात लवकरच दाखल होणार ‘राफेल’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेलविषय घेतलेल्या योग्य निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ‘‘ पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सबरोबर आंतर-सरकारी करार केल्यामुळे राफेल विमानांची खरेदी होवू शकली. ही विमाने घेण्याचा अतिशय योग्य निर्णय आधी घेतला होता. परंतु खरेदीच्या प्रलंबित प्रक्रियेमुळे या व्यवहारामध्ये कोणतीही प्रगती होत नव्हती.’’
सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोविड19 महामारीचा उद्रेक झालेला असतानाही आणि सर्वत्र निर्बंध असतानाही राफेल विमाने आणि त्याची शस्त्रास्त्रे वेळेवर भारतामध्ये पोहोचविल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी डॅसॉल्ट अॅव्हिएशन आणि इतर फ्रेंच कंपन्यांचे आभार मानले आहेत.

हे वाचलंत का?

भारत- चीन तणाव : भारताचे २० जवान शहिद 

Rashtramat

ऐश्वर्या आणि आराध्याला देखील कोरोना

Rashtramat

गोव्यात कोरोनाचे २ बळी, मृतांची संख्या ११

Rashtramat

Leave a Comment