Rashtramat

‘…अन्यथा गोंयकार रस्त्यावर उतरतील’

kalasa-bhandura

‘कळसा-भंडुरा’बद्दल गोवा सुरक्षा मंच आक्रमक

पणजी :
कोरोनापासून ते कळसा-भंडुरा प्रकल्पापर्यंत सगळ्याच बाबतीत ठोसपणे निर्णय घेण्यात गोवा राज्य सरकार सातत्याने अपयशी ठरले असून, सरकारच्या र्निनायकी, मिळमिळीत धोरणामुळेच प्रत्येक पातळीवर गोंयकाराना अपयशाचे धनी व्हावे लागत आहे. कर्नाटक राज्य सरकारने म्हादय नदीवरील विवादित कळसा आणि भांडुरा प्रकल्पासाठी आज अतिरिक्त 885.60 कोटी रुपये मंजूर करणे हे गोव्यासाठी अपमानकारक असून, गोवा सरकारने या प्रकल्पाकडे सुरुवातीपासून कानाडोळा केल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. अशा शब्दात गोवा सुरक्षा मंच युवा मंचाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी राज्यसरकारवर प्रसिध्दीप्रत्रकाद्वारे ताशेरे ओढले आहेत.

अमित शाह यांना कोविड बाधा
Kalasa-bhandura
कर्नाटक राज्य सरकारने सुरुवातीपासूनच गोव्याला, गोव्याच्या राज्यकर्त्यांना जमेलाच धरले नव्हते, त्यामुळेच आज कर्नाटकने एकूण 1677.3 कोटी रुपयांचा निधी कळसा-भंडुरासाठी मंजूर केला आहे. म्हादय ही गोंयकारांची जीवनदायिनी आहे, त्यामुळे कर्नाटकने अशाप्रकारे म्हादय रोखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गोंयकारांना मरणाच्या खाईत लोटण्यासारखेच आहे. हा प्रयत्न गोवा सरकारने हाणून पाडणे गरजेचे आहे. कर्नाटकला हा प्रकल्प बंद करण्यासाठी गोवा सरकारने हरतर्‍हेने प्रयत्न केले पाहिजे, आणि जर का सरकार हे करणार नसेल तर समस्त गोंयकार रस्त्यावर उतरून गोवा सरकारचा निषेध करण्यात येईल, असेही यावेळी नितीन फळदेसाई यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.

हे वाचलंत का?

‘कोरोनाबाबत सरकारचे वरातीमागून घोडे’

Rashtramat

राजनैतिक सुत्रपाताची सुरुवात…!

Rashtramat

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

Rashtramat

Leave a Comment