Rashtramat

जागतिक स्तरावर चमकले एनएमआयएमएस ‘डिझाइन’चे विद्यार्थी

NIMMs

मुंबई :
एडीआय इंटरनॅशनल स्टुडंट्स डिझाइन कॉम्पिटिशन-बॅटल ऑफ प्रोजेक्ट्स पीडीएफ पुणे या स्पर्धेमध्ये मुंबईस्थित ​एनएमआयएमएस स्कूल ऑफ डिझाइनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध विभागात पारितोषिके पटकावत अव्वल राहिले आहेत. यामध्ये हितिक्षा कनानी या विद्यार्थिनीने पॅकेजिंग डिझाइनमध्ये पहिले बक्षीस, आरूषी शुक्ला, श्‍वेता मंडावले आणि दामिया जसवानी या विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट डिझाइनमध्ये पहिले बक्षीस मिळवले तर राहिल परमार व राजश्री दासगुप्ता यांनी मोबिलिटी डिझाइनमध्ये विशेष उल्लेखनीयचा पुरस्कार पटकावला. तर आरूषी शुक्ला, श्‍वेता मंडावले आणि दामिया जसवानी या तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी इंटरनॅशनल कोअर 77 डिझाइन अ‍ॅवॉर्ड्स 2020मध्ये पहिले उत्तेजनार्थ आणि कम्युनिटी चॉईस अ‍ॅवॉर्ड प्राप्त केले आहेत. सामाजिक प्रभाव श्रेणीअंतर्गत सादर केलेल्या या प्रकल्पाचा विषय ‘अंधांसाठी चुंबकीय टाइल्स/सिमेंट’ असा होता.
या स्पर्धेत 52 देशातून 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डिसोर्स इंटरनॅशन कोरोना डिझाइन चॅलेंज 2020 मध्ये गेम डिझाइन श्रेणीमध्ये अक्षता चिटणीस, खुशाली पारेख, निधी कास्तिया आणि निकिता भटनागर यांनी दोन बक्षीसे मिळविले तर कम्युनिकेशन डिझाइनमध्ये ‘जादा हिरो मत बन’ हे कॅम्पेन डिझाइन करणार्‍या स्कूलच्या प्रेषिता देशमुखने एक पारितोषिक पटकावले. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल युएमओ डिझाइन सोशन इनोव्हेशन चॅलेंज 2020मध्ये 250+ स्पर्धकांमधून निवडलेल्या 30 अंतिम स्पर्धकांमध्ये स्कूलच्या आरूषी मेहरा, हेतावी शहा, पलक गोयल, समीक्षा सचदेवा या द्वितीय वर्षातील विद्यार्थिंनींनी आपले नाव नोंदविले. बी.डिइएस इन ह्यूमनायझिंग टेक्नॉलॉजीच्या या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर देखील चमकदार कामगिरी केलेली आहे. अनंत राष्ट्रीय विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या क्यूइडी2020मध्ये द्वितीय वर्षात शिकणार्‍या अनुया देसाई व प्रेषिता देशमुख यांचा संघ विजेता ठरला. त्यांनी सादर केलेल्या ‘सर्क्युलर फॅशन’द्वारे फॅशन आणि कपडे अधिक काळ कसे वापरता येतील हे प्रदर्शित करण्यात आले होते. देशभरातील 100+ अधिक स्पर्धकांमधून व तीन काठिण्य स्तरावर उत्तीर्ण होत त्यांचा हा प्रकल्प निवडण्यात आला.
महिला अत्याचाराला लघुपटातून ‘रेसिस्ट’
NIMMS
यावेळी कनेक्टिंग ड्रीम्स फाउंडेशन सोशल इम्पॅक्ट चॅलेंजमध्ये स्कूल ऑफ डिझाइनच्या फायरफ्लाइज ही टीम ड्रीम अ‍ॅवॉर्ड्स 2020मध्ये सोशल इम्पॅक्ट चॅलेंजमध्ये पहिली तीन पारितोषिके जिंकणारी टीम ठरली. अमेया सावंत, शशांक वेंकटरामन, आरूषी मेहरा हे द्वितीय वर्षातले विद्यार्थी आणि तृतीय वर्षातले राजश्री दासगुप्ता व राहिल परमार हे एक टीम म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले होते. या टीमने मुंबईच्या 10+ सुप्रसिध्द कॉलेजमधील 15 टीमशी स्पर्धा करत महाराष्ट्राच्या सोशल एंटरप्रायजेस इंडस्ट्रीमध्ये एक नवा बदल घडवून दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. 
या महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन विजयाच्या दिशेने भरारी घेत एनएमआयएमस स्कूल ऑफ डिझाइनला विविध पुरस्कारांनी सन्मानित केल्याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या काळातही विद्यार्थ्यांनी या वेळेचा सुनियोजित वापर करत नावीन्यपूर्ण व समाजपयोगी निर्मिती केल्याचे विशेष समाधान असल्याचे नमूद करत  हे विद्यार्थी हेच खरे आमच्या स्कूलचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर्स आहेत आणि ‘आव्हान-उत्क्रांती-प्रभाव’ या स्कूलच्या ध्येयवाक्याला साजेसे कार्य करत असल्याचे स्कूलच्या संस्थापक- संचालक प्रोफेसर मनिषा फडके यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

कोंकणी भाशा मंडळाने घडवला इतिहास

Rashtramat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

Rashtramat

‘…म्हणून सुरु करावे लागले पर्यटन’

Rashtramat

Leave a Comment