Rashtramat

घर बसल्या घ्या ‘माऊंट मेरी’चे दर्शन

मुंबई :

बांद्र्याच्या पवित्र वर्जिन मेरीच्या जन्माचा सोहळा दरवर्षी अवर लेडी ऑफ द माऊंट चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केला जातो. या तब्बल 17 दिवस चालणाऱ्या सोहळ्यात लाखो भाविक प्रार्थनेसाठी एकत्र येत असतात. खरंतर या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असतं बांद्र्याची जत्रा म्हणजेच प्रसिद्ध बँड्रा फेअर. मदर मेरीच्या जन्मानिमित्त प्रचंड उत्साहात ही जत्रा पार पडते.

मात्र, गेल्या 200 वर्षांत पहिल्यांदाच, यंदा कोविड -19च्या जागितक संकटाच्या बंधनांमुळे ही वार्षिक जत्रा पार पडणार नाही.
बहुविध स्टॉल्स आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी यंदाची जत्रा रंगणार नसली तरी बॅसिलिकाने यंदा डिजिटल मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत टाटा स्काय दर्शनवर प्रेक्षकांना नोव्हेना आणि ऑक्टेव्ह फीस्टच्या प्रार्थनेचा लाभ घेता यावा यासाठी या प्रार्थना लाईव्ह दाखवल्या जाणार आहेत.

• नोव्हेना मास लाईव्ह टेलिकास्ट। 12 सप्टेंबरपर्यंत | सकाळी 7:45 – 9:15
• ऑक्टेव्ह मास लाईव्ह टेलिकास्ट। 13 ते 20 सप्टेंबर | सकाळी 7:45 – 11:30
• फीस्ट ऑफ अवर लेडी (बँड्रा फीस्ट)। 13 सप्टेंबर | सकाळी 7:45 – 11:30
या प्रार्थनेला उपस्थित राहण्याची परंपरा कायम रहावी यासाठी चर्च प्रशासनाकडे हजारोंच्या संख्येने विनंत्या आल्या होत्या. यासाठी कुटुंबासहित प्रार्थना करण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठांची सोय पाहून सर्व प्रार्थना लाईव्ह टेलिकास्ट कराव्यात अशी विनंती भाविकांनी केली होती. त्यामुळे हा सोहळा टेलिकास्ट करण्यासाठी चर्चने टाटा स्कायशी संपर्क केला आणि त्यातून सबस्क्राईबर्ससाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दररोज प्रथम इंग्रजीत प्रार्थना होतील.
त्यानंतर कोकणी, मराठी, तमिळ, मल्याळम आणि गुजराती अशा वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये प्रार्थना केल्या जातील.

सबस्क्राईबर्सनी घरातूनच आरामात लाईव्ह फीड पाहण्यासाठी रीमोटवर Actve/Apps हे बटण दाबून त्यानंतर मेनूमध्ये टाटा स्काय दर्शन- फ्री > माऊंट मेरी बॅसिलिका, बांद्रा निवडून किंवा टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून टाटा स्काय दर्शन या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

हे वाचलंत का?

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

Rashtramat

गोव्यात शुक्रवार पासून लॉकडाऊन

Rashtramat

कोंकणी नाटकाच्या पहिल्या ईबुकचे आज प्रकाशन

Rashtramat

Leave a Comment