Rashtramat

‘परिक्रमा’च्या अध्यक्षपदी फिरोझ शेख

parikrama

पणजी, दि. 17 (प्रतिनिधी) :
युवा कार्यकर्ता आणि विद्यार्थी नेता फिरोज शेख याची ’परिक्रमा नॉलेज टर्मीनस’ या ज्ञानात्मक, सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचा तिसरा अध्यक्ष म्हणून त्याने मावळत्या अध्यक्षा श्रुती भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी वर्ष 2020-23 या तीन वर्षांसाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
परिक्रमाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये अकरापैकी चार महिला पदाधिकारी नेमत परिक्रमाने आपल्या स्त्री सबलीकरणाला पुन्हा एकदा प्रत्यक्षात आणले आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये,
फिरोझ शेख (अध्यक्ष), वैभव कळंगुटकर (उपाध्यक्ष), रमीझा काटागुर (सचिव), दिवीशा कामत सातोस्कर (अर्थ सचिव), अभिजीत गावकर (सहसचिव), यशोधन दिवकर (सह अर्थ सचिव) त्याचप्रमाणे सक्रीय सदस्य म्हणून शाकिब सय्यद, उर्वशी नायक, तन्वी नायक, शिवदीप नायक, सूरज कामत यांची निवड करण्यात आली.
गोवा विद्यापीठामध्ये ’आंतरराष्ट्रीय संबंध’ विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेला फिरोझ विद्यार्थीदशेपासून विविध चळवळीमध्ये सक्रीय आहे. 2011-12 मधील माध्यम भास आंदोलन तथा गोवा विद्यापीठातील ‘टुगेदर फॉर युर्निव्हसिटी’ या चळवळीमध्ये फिरोझ सक्रीय होता. ‘परिक्रमाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करण्याची प्रक्रिया अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे यामाध्यमातून समाजाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीही आम्ही सक्रीय राहू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष फिरोझ शेखने यावेळी दिली.
गोव्यातील अंगणवाड्या झाल्या हायटेक

2017 साली स्थापना करण्यात आलेल्या परिक्रमा नॉलेज टर्मिनस या संस्थेच्यामाध्यमातून— शिक्षण साधन सुविधा तयार करण्यात येतात. त्याचप्रमाणे अ‍ॅकेडॅमिक फोरम, सेलिब्रेट आयडिआ, डॉ. माधवी सरदेसाई युवा शिक्षक पुरस्कार, कलेक्टिव, विश्व परिक्रमा, राऊंड टेबल असे विविध उपक्रम वर्षभर साजरे होतात.
16 सप्टेंबर रोजी परिक्रमाच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक झाली. यावेळी प्रभारी तथा निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी कामकाज पाहिले.

हे वाचलंत का?

‘लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ’

Rashtramat

‘स्काय फाउंडेशन’ची आभाळाएवढी मदत

Rashtramat

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

Rashtramat

Leave a Comment