Rashtramat

‘नेत्रदानाबद्दल राज्यात जागृती करणार’

मडगाव :
अवयवदान चळवळ गोव्यात चांगल्या पध्दतीने रुजत असून, फार्तोडा येथील अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युथ असोशिएनच्यावतीने राज्यभरात नेत्रदानाचे आवाहन करण्यात आले असून, संस्थेच्यावतीने सुमारे 43 जणांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची शपथ नुकतीच घेतली.
संस्थेच्यावतीने अध्यक्ष रोहित वेर्णेकर यांनी आपल्या कुटूंबिय आणि संस्थेच्या सदस्यांना नेत्रदानाचे आवाहन नुकतेच केले होते. यानुसार संस्थेच्या 43 सदस्यांनी आपले मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज ’सक्षम गोवा’ संस्थेमध्ये जमा करत, यावेळी सक्षम गोवाचे अध्यक्ष अभय प्रभू, सचिव संतोष कामत यांची उपस्थितीत नेत्रदान करण्याबद्दल शपथ घेतली.

अवयवदान हे सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचे असून, प्रत्येकाने किमान नेत्रदान करून आपल्या मृत्यूनंतरही जगात डोळ्यांच्या माध्यमातून अमर राहण्याची संधी कमवावी आणि देशातील अंधार दूर करण्यात आपले सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युथ असो.च्यावतीने करण्यात आले असून, राज्यामध्ये नेत्रदानाबद्दल जागृती करण्याबद्दल संघटना आग्रही राहणार असल्याचेही रोहित वेर्णेकर यांनी यावेळी नमूद केले.

हे वाचलंत का?

‘गोव्यात समूह संसर्ग झालेला नाही’

Rashtramat

कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू

Rashtramat

अभिषेकही कोरोना पॉझिटिव्ह

Rashtramat

Leave a Comment