Rashtramat

आता आले परीक्षांसाठी विशेष अ‍ॅप

​मुंबई​ ​:
महाराष्ट्रातील विद्यापीठांनी एटीकेटी चाचण्यांसह अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरविले आहे. तसेच येथून पुढील बऱ्याच परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या तयारीबरोबरच परीक्षेला सामोरे जाण्याची भीती आणि उत्सुकताही लागून राहिली आहे.
प्राइम सॉफटेक सोल्यूशन्स प्रा. लि. च्या पायल दोशी यांनी “मायक्लास अ‍ॅडमिन” ऑनलाईन प्लॅटफॉर्म उभा केला असून तो शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एमसीक्यू आधारित परीक्षा आयोजित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि इतर अंतिम वर्षासाठी तसेच स्पर्धा आणि प्रवेश परीक्षेचा प्रीलोड डेटाबेस असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नक्कीच होईल. शाळा, महाविद्यालय व शिक्षक ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी त्यांचे प्रश्न अपलोड करू शकतात. हयाचा उपयोग चाचणी तसेच सेमीस्टर परीक्षा घेण्यासाठी होतो. या परीक्षा वेळेवर आधारित असतात आणि सॉफ्टवेअरद्वारे टेस्ट पेपरचे स्वयंचलितपणे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे चाचणीचा पेपर संपताच त्यांचे गुण कळतात व त्वरित निकाल लावता येतो. अधिक माहिती www.myclassadmin.com वर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या सरावासाठी PREXAM हा अँड्रॉइड अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध केला असून www.prexam.com हया वेबसाइटवर सुद्धा पाहता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांसाठी सराव करण्यास मदत होईल. ही ऑनलाइन साधने नक्कीच शैक्षणिक समुदायाला दिलासा देणारी ठरतील.

हे वाचलंत का?

कोरोनामुळे आज तीन मृत्यू; एकूण बळी ३२

Rashtramat

9 ऑगस्टपासून किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर

Rashtramat

अमित शाह यांना कोविड बाधा

Rashtramat

Leave a Comment