Rashtramat

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींविरोधात कारवाई

​मुंबई:
वर्ष २०२० मधील जून व जुलै महिन्‍यांमध्‍ये अॅडव्‍हयर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) ३६३ जाहिरातींविरोधात करण्‍यात आलेल्‍या तक्रारींसंदर्भात चौकशी केली, ज्‍यापैकी ७६ जाहिराती जाहिरातदारांनी त्‍वरित मागे घेतल्‍या. एएससीआयच्‍या स्‍वतंत्र कन्‍झ्युमर कम्‍प्‍लेण्‍ट्स कौन्सिल (सीसीसी)ने उर्वरित २८७ जाहिरातींची कसून चौकशी केली, ज्‍यापैकी २५७ जाहिरातींविरोधातील तक्रारींचे निराकरण करण्‍यात आले. यापैकी १५० जाहिराती आरोग्‍यसेवा विभागाशी, ४० जाहिराती शिक्षण विभागाशी, २० जाहिराती अन्‍न व पेय विभागाशी, ४ जाहिराती जीएएमए तक्रारींशी, १२ जाहिराती पर्सनल केअरशी आणि ३१ जाहिरातील इतर विभागाशी संबंधित होत्‍या.

कोविड-१९ विरोधातील लढा सुरू असण्‍यासोबत कोरोनाविषाणूसाठी उपचार व प्रतिबंधाबाबत खोटे दावे करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत आहे. आयुष मंत्रालयासोबत सहयोगाने एएससीआय समाजाच्‍या हितासाठी अशा खोट्या दाव्‍यांचे निर्मूलन करण्‍याप्रती सातत्‍​​याने काम करत आहे. मे ते जून महिन्‍यांदरम्‍यान नियामकाकडे अशा ९७ केसेसच्‍या तक्रारी करण्‍यात आल्‍या. एएससीआयचे अध्‍यक्ष सुभाष कामत याबाबत सांगताना म्‍हणाले,”कोविड-१९ साठी उपचार व प्रतिबंधाबाबत खोटे दावे करणा-या जाहिरातींमध्‍ये वाढ होत आहे. विशेषत: ग्राहकांना विषाणूबाबत अधिक असुरक्षितता वाटत असताना त्‍यामध्‍ये खूपच वाढ झाली आहे. आमच्‍यासारख्‍या नियामकांसाठी या जाहिराती ग्राहकांच्‍या चिंतेमध्‍ये वाढ करणार नाहीत याची खात्री घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. आम्‍हाला माहित आहे की, अशा प्रकारचे खोटे दावे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. आम्‍ही आयुष मंत्रालयासोबत सहयोगाने काम करत समाजहितासाठी अशा प्रकारच्‍या खोट्या दाव्‍यांचे निर्मूलन करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”​

हे वाचलंत का?

9 ऑगस्टपासून किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर

Rashtramat

महिला अत्याचाराला लघुपटातून ‘रेसिस्ट’

Rashtramat

कोरोनाचा दिवसात तिसरा बळी

Rashtramat

Leave a Comment