Rashtramat

‘बिग बी’ झाले ‘स्वास्थ भारत’चे सदिच्छादूत

मुंबई :
स्वच्छ भारत मोहिमेमुळे देशभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना आता विविध संस्था आणि संघटना स्वास्थ्य भारत मोहीम देशभरात राबवत आहेत. भारतीय नागरिकांनी स्वस्थ आणि तंदुरुस्त राहावे यासाठी एनडीटीव्ही आणि डेटॉलच्यावतीनेदेखील स्वास्थ्य भारत मोहिमेच्या सातव्या हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी मोहिमेचे राजदूत म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध अभिनेते बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना या मोहिमेचे सदिच्छादूत म्ह्णून घोषित करण्यात आले.
detol, NDTV
आपल्या या निवडीबद्दल सांगताना, अमिताभ बच्चन यांनी नमूद केले कि, स्वच्छ भारत निरोगी भारताकडे कसे वळतो या बद्दल ते बोलले कारण आजूबाजूचे वातावरण स्वच्छ असेल तरच आरोग्य वाढू शकते. आरोग्यापेक्षाही मानवी जीवनासाठी मौल्यवान काहीही नाही. त्यामुळे  एनडीटीव्ही आणि डेटॉलच्यावतीनेदेखील आयोजित स्वास्थ्य भारत मोहिम ही खूप महत्वाची मोहीम असून, या मोहिमेचा सदिच्छादूत म्हणून काम करताना मला विशेष आनंद आणि जबाबदारीही वाटत आहे. 

हे वाचलंत का?

‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

Rashtramat

…अखेर ‘पबजी’चा खेळ खल्लास

Rashtramat

‘आता विस्तारवादाचे जग संपले’

Rashtramat

Leave a Comment