Rashtramat

‘म्हाका नाका गे’वर गोलमेज चर्चा

पणजी :
गोव्याची राजकीय अर्थव्यवस्था या विषयावर ‘परिक्रमाच्या’वतीने गेली तीन वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून चर्चासत्र आणि स्पर्धा घडवून आणल्या जात आहेत. यानुसार यावर्षी गोव्यातील प्रस्तावित काही प्रकल्पांच्या विरोधात होणाऱ्या विविध चळवळींवर अभ्यासपूर्ण आणि सार्वजनिक धोरणांना केंद्रबिंदू ठेवून परिक्रमा नॉलेज टर्मिनसतर्फे ‘Syndrome म्हाका नाका गे’ या विषयावर १८ ऑक्टोबर २०२० या दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता गोलमेज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात चर्चेसाठी सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर, ‘लोकमत’चे संपादक राजू नाईक, उद्योजिका संगीता नाईक, पत्रकार विश्वनाथ नेने आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश नाईक सहभागी होणार आहेत. तसेच परिक्रमाच्या अनेक उपक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले मोहित सुखटणकर, लक्षिता नाईक, अनिश अग्नी आणि विभाव सावंत यांचीही चर्चेसाठी निवड करण्यात आली आहे. 
या चर्चेचं संयोजन अमेय कामत करणार असून, हा कार्यक्रम ‘गूगल मीट’ माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 7743881853 या वॉट्एप क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणी केल्यानंतर कार्यक्रमाचे लिंक पुरवले जाईल. इच्छुकांना नोंदणी करत असताना आपले प्रश्न मांडण्याची मुभा देण्यात आल्याचे ‘परिक्रमा नॉलेज टर्मीनस’ची सचिव रमीझा काटगुर हिने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

हे वाचलंत का?

कोंकणी नाटकाच्या पहिल्या ईबुकचे आज प्रकाशन

Rashtramat

१८ जून: शेतकरी पारतंत्र्य दिन

Rashtramat

लॉकडाऊनचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक

Rashtramat

Leave a Comment