Rashtramat

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना ‘कर्मयोद्धा’ पुरस्कार

jivba dalavi

पेडणे :
अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचा ‘कर्मयोद्धा’ पुरस्कार पेडणेचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच त्यांची पेडणे येथील कार्यालयांत भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला.दरम्यान दळवी हे ड्रग्स माफियांचे कर्दनकाळ असल्याचे फाऊंडेशनच्या राष्ट्रीय संचालिका शोभा कोकिटकर यांनी म्हटले आहे. 
या शिष्टमंडळांत कोकीटकर यांच्या समवेत,फाऊंडेशनच्या गोवा विभागाचे प्रभारी अध्यक्ष सतिश नाईक,उपाध्यक्ष नयनेश गावडे,उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेश ( पांडुरंग ) खवणेकर,चंदगड तालुका अध्यक्ष संजय गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक दळवी हे आपली जबादारी ओळखून आपल्या कर्तव्यांत कसूर न करता आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आपले कार्य कोणाच्या दबावाला बळी न पडता कर्तव्याची जाण ठेऊन बेकायदेशीर गोष्टीना पायबंद घालून बेधडकपणे अमलीपदार्थ विरोधांत मोहीम उघडल्याने ते ‘ ‘कर्मयोद्धा ‘ पुरस्काराला पात्र ठरल्याचे शोभा कोकीटकर यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी दळवी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या कामांत फाऊंडेशनचे सदैव सहकार्य राहील याची ग्वाही दिली.जिल्हाध्यक्ष सुरेश खवणेकर यांनी फाऊंडेशनच्या कार्याचा थोडक्यांत आढावा घेतला व दळवी यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले कि,आपण आपले कर्तव्य निभावित असून अन्याय,अत्याचार,खून,दरोडे,बलात्कार,बेकायदेशीर कारनामे,अमलीपदार्थ या गोष्टींचा आपल्याला सदैव तिटकारा आहे.अशा गोष्टीना आपण कधीच थारा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले व फाऊंडेशनकडून दिलेल्या पुरस्काराबद्दल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

हे वाचलंत का?

‘कोंकणी नियतकालिकां’वर उद्या ‘वेबिनार’

Rashtramat

‘अधिकाधिक कोंकणी ‘इ-बुक’ प्रकाशित व्हावित’

Rashtramat

महिला अत्याचाराला लघुपटातून ‘रेसिस्ट’

Rashtramat

Leave a Comment