पणजी :
प्रसिध्द कोंकणी कवी उदय नरसिंह म्हांबरो यांच्या ’इंद्रधोणू उदेवं’ या नव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोमवार,14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. बिंब प्रकाशन आणि विन्सन फिल्म आणि मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशनसोहळ्याचे युट्यूबवर आयोजन करण्यात आले आहे.
मातीच्या आणि माणसाच्या गोष्टी आपल्या भाषेतून अभिव्यक्त करणार्या त्यांच्या कवितेला सुरुवातीपासूनच रसिकमान्यता लाभली आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोंकणी भाषा आणि कविता देशभरात पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जनमनातील कवी म्हणून प्रसिध्द असलेले उदय म्हांबरो आपल्या ‘हंय सायबा’ आणि ‘मनशाच्या सोदांत’ या गाजलेल्या काव्यसंग्रहानंतर आता ‘इंद्रधोणू उदेवं’ हा नवाकोरा संग्रह घेऊन आले आहेत. या संग्रहाचे प्रकाशन मंगळुरस्थित विश्व कोंकणी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष बस्ती वामन शणै यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रसिध्द मराठी कवयित्री डॉ. अनुजा जोशी काव्यसंग्रहावर बोलणार आहेत. सदर कार्यक्रमाचे प्रसारण युट्यूबवरून होणार असून, रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बिंब प्रकाशनच्यावतीने दिलीप बोरकर यांनी आणि कवी उदय म्हांबरो यांनी केले आहे.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments