Rashtramat

‘इंडियन पॅनोरमा’वर मल्याळम सिनेमांचे वर्चस्व

IFFI

पणजी, दि. 19 (प्रतिनिधी) :
कोरोनासंकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 51 व्या इफ्फीतील (iffi) इंडियन पॅनोरामा या महत्वाच्या विभागाची आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत ट्विटद्वारे घोषणा केली. जावडेकरांनी घोषित केलेल्या यादीनुसार यावर्षीच्या इंडियन पॅनोरमावर मल्याळम भाषेतील सिनेमांचे संपूर्ण वर्चस्व दिसत असून सिनेमा आणि लघुपट मिळून एकूण सहा मल्याळम दर्जेदार सिनेमांचा आस्वाद रसिकांना जानेवारीत होणार्‍या इफ्फीमध्ये घेता येणार आहे.
जानेवारी 16 ते 24 दरम्यान होणार्‍या 51 व्या इफ्फीतील (iffi) इंडियन पॅनोरामा विभागाची आज घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षीच्या इंडियन पॅनोरमाप्रमाणे याहीवर्षी मल्याळम सिनेमांनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. यावर्षी मल्याळममधून सेफ (दिग्द. प्रदीप कलीपुरयथ), ट्रान्स (दिग्द. अन्वर रशिद), केट्टीयोलानू एन्टे मलखा (दिग्द. निसाम बशीर), ताहिरा (दिग्द. सिद्दक परवूर), कपेला (दिग्द.मुहम्मद मुस्तफा) या पाच सिनेमांचा आणि ओरू पथिरा स्वप्नम् पोळे (दिग्द. शरण वेणुगोपाळ) या लघुपटाची निवड झाली आहे. मल्याळमसोबत मराठी सिनेमाने सुध्दा या यादीमध्ये तीन सिनेमा आणि तीन लघुपटांसह महत्वाचे स्थान पटकावले आहे. यामध्ये जून (दिग्द. वैभव किश्ती, सुॠद गोडबोले), प्रवास (दिग्द. शशांक उडापूरकर), कारखानीसांची वारी (दिग्द.मंगेश जोशी) या सिनेमांची आणि खिसा (दिग्द. राज मोरे), पांढरा चिवडा (दिग्द. हिमांशू सिंह), स्टील अलाईव्ह (दिग्द.ओंकार दिवाडकर) या तिन लघुपटांचा समावेश आहे.
IFFI
उर्वरित सिनेमांची यादी पुढीलप्रमाणे :
ब्रिज (आसामी) अविजात्रिक (बंगाली), ब्रह्म जाने गोपोन कोमोटी (बंगाली), अ डॉग अ‍ॅण्ड हिज मॅन (छत्तीगढी), अप, अप अ‍ॅण्ड अप (इंग्लीश), आवर्तन (हिंदी), सांड की आंख (हिंदी), पिंक एली? (कन्नड), एगी कोना (मणिपुरी), कलिरा अतिता (उडिया), नमो (संस्कृत), थाएन (तमिळ), गतम् (तेलुगू), असुरन (तमिळ), छिछोरे (हिंदी).
लघुपटांची यादी :
100 इअर्स ऑफ क्रिस्तोमस (इंग्लीश), अहिंसा-गांधी : द पॉवर ऑफ द पॉवरलेस (इंग्लीश), कॅटडॉग (हिंदी), ड्रामा क्विन्स (इंग्लीश), ग्रीन ब्लॅकबेरीज् (नेपाळी), हायवेस ऑफ लाइफ (मणिपुरी), होली राईट (हिंदी), इन अवर वर्ल्ड (इंग्लीश), इन्वेस्टिंग लाईफ (इंग्लीश), जादू (हिंदी), जात आई बसंत (पहाडी/हिंदी), जस्टिज डिलेड बट डिलिव्हर्ड (हिंदी), पांचिका (गुजराती), राधा (बंगाली), शांताबाई (हिंदी), द 14 फेब्रुवारी अ‍ॅण्ड बियॉण्ड (इंग्लीश).

हे वाचलंत का?

उदय भेंम्ब्रे यांना कोंकणी भाषा पुरस्कार

Rashtramat

पुन्हा भाजपच!

Rashtramat

जुगार खेळल्यामुळे गाढव अटकेत

Rashtramat

Leave a Comment