Rashtramat

‘एमआयएम’ लढणार गुजरात विधानसभा

aimim

औरंगाबाद :
​​बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम)ने आता गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे. एमआयएम आता गुजरातमधील आगामी काळातील स्थानिक निवडणुकांसह विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) बरोबर एमआयएमने हातमिळवणी केली आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
aimim
“मागील अनेक वर्षांपासून गुजरातच्या जनतेची अशी इच्छा आहे की, एमआयएमने गुजरातमध्ये देखील यावं. यासाठी अनेक दिवसांपासून तिथले लोकं आमच्या संपर्कात होते. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील गुजरातमधील अनेकांनी या पार्श्वभूमीवर भेट घेतली आहे. त्यामुळे आम्ही आता छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) बरोबर राहून गुजरातमधील आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात छोटूभाई वासवा व एमआयएम अध्यक्ष ओवसी यांची बैठक देखील झाली आहे. यानंतर मला ओवसींकडून गुजरातला जाऊन बीटीपीच्या नेते मंडळींशी पुढील रणनीती संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये मी गुजरातला जाणार आहे.” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

गोव्यात कोरोनाचा पहिला बळी

Rashtramat

कोरोना लस, समज-गैरसमज आणि ‘लोकजागर’

Rashtramat

पालिका निवडणुका पुढे ढकलल्या

Rashtramat

Leave a Comment