Rashtramat

‘सक्षम भारत’च्या बी. शामराव यांचा काँग्रेस प्रवेश

congress

मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी)
’सक्षम भारत’ या देशव्यापी संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक, युवा नेते बी. शामराव यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी शामराव यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे-कल्याण-डोंबिवली भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रीय राहत सामाजिक सेवेमध्ये झोकून दिलेले बी. शामराव हे एमबीए (फायनान्स) असल्यामुळे आणि महाराष्ट्र,़ गोवा, दिल्ली, बिहार, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये पसरलेल्या ‘सक्षम भारत’ संघटनेच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना एकत्र करणारे नेतृत्व पक्षात आल्याबद्दल आपल्याला विशेष आनंद झाल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तर, काँग्रेस हा सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी पक्ष असून, स्वातंत्र्यपूर्व काळखंडापासून देशसेवेसाठी सदैव अग्रेसर राहिलेल्या पक्षाचा कार्यकर्ता होणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. बालपणापासून ज्या विचारासोबत वाढलो त्या काँग्रेस विचारांचा आता एक अविभाज्य भाग होण्याची प्रक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. राज्यामध्ये पक्षविचारविस्तार करताना अधिकाधिक सुशिक्षित तरुणवर्ग काँग्रेससोबत जोडण्यासाठी आपण अधिक सक्रीय राहणार असल्याची प्रतिक्रिया बी. शामराव यांनी यावेळी माध्यमांना दिली.

हे वाचलंत का?

108 देश, एक विषय, 2800 चित्रपट

Rashtramat

गोव्यात कोरोनाचे २ बळी, मृतांची संख्या ११

Rashtramat

’70चे दशक भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ’

Rashtramat

Leave a Comment