Rashtramat

चला, राजकारणी बनूया!

politician

मुंबई :
राजकीय क्षेत्रात सक्रिय होणार्यासांसाठी ‘टीच फॉर इंडिया’ एल्युमनी हेमाक्षी मेघानी आणि प्रखर भारतीय यांनी स्थापित केलेल्या इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी १५ ऑगस्ट २०२१ पासून नवीन उपक्रम राबवत आहेत. यामध्ये सहभाग घेण्याची प्रकीर्या नुकतीच सुरु झाली आहे.
‘दि गुड पॉलिटिशियन’ हे आधीपासूनच राजकीय क्षेत्रात समाविष्ट असलेल्या तळागाळातील राजकीय नेत्यांना तयार करण्यासाठी सज्ज आहे. एक वर्षाचा कालावधी असलेला हा कार्यक्रम सरपंच आणि नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांसाठी आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी हा कार्यक्रम हिंदी व इंग्रजी भाषेत शिकविला जाईल. ‘दि गुड पॉलिटिशियन’ मध्ये ३०% निवासी प्रशिक्षण आणि ७०% फील्ड ॲप्लिकेशन्स असतील. या प्राध्यापकांमध्ये राजकीय नेते, राजकीय अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांची एक श्रेणी आहे. अभ्यासक्रमात महाराष्ट्र, दिल्ली आणि दक्षिण भारतातील विविध भागांचा समावेश आहे; प्रवास हा भारताच्या वास्तवांमध्ये डोकावण्याचा महत्वाचा भाग आहे ज्यामुळे लोकांच्या गरजा सखोल समजून घेता येतात. एक वर्षाच्या या कोर्समध्ये तज्ञ प्रॅक्टिशनर्स आणि शैक्षणिक विद्याशाखा यांच्याकडुन कठोर-वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाईल. वेगवेगळ्या पक्षांमधील अतिथी स्पीकर्स आणि सक्रिय राजकारण्यांसह अनेक पॅनेल चर्चा आयोजित केल्या जातील ज्यामुळे वैयक्तिकरित्या कार्य करण्यासाठी तसेच गटात शिकण्यासाठी सक्षम होता येईल.
politician
या कोर्सची फी दोन लाख रुपये आहे आणि इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीमध्ये पूर्ण शिष्यवृत्तीसुद्धा उपलब्ध आहे. आर्थिक कारणास्तव कोणासही नकार दिला जाणार नाही.
आयएसडीच्या प्राध्यापकांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे माजी खासदार प्राध्यापक राजीव गोवडा, भाजपचे माजी मंत्रीसंजय पासवान, माजी सीईसी एस वाय कुरेशी, कमला भसीन आणि रजनी बक्षी समाविष्ट आहे. परेश सुकथनकर, तारा कृष्णास्वामी, व्यंकट कृष्णन, उज्वल ठाकर, प्रीता बंसल आणि अरुण मायरा हे इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीचे मार्गदर्शक आहेत.

अर्जदार वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतातः https://www.indianschoolofdemocracy.org/

हे वाचलंत का?

अनलॉक 3 : काय सुरु, काय बंद?

Rashtramat

कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू

Rashtramat

कोंकणी भाशा मंडळाने घडवला इतिहास

Rashtramat

Leave a Comment