Rashtramat

डाबरने आणले ‘रेड पुलिंग ऑइल’

dabur

मुंबई :
भारतातील आघाडीची विज्ञान-आधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडच्यावतीने  ‘रेड पुलिंग ऑईल’ या आयुर्वेदिक माऊथवॉश सादर करण्यात आले. अल्पावधीतच लोकप्रिय ठरत मार्केट लीडर ठरलेल्या डाबर रेड टूथपेस्ट पाठोपाठ आता या नव्या उत्पादनासोबतच डाबरने ओरल केअर मार्केटमध्ये आपला एक संपूर्ण नवीन आणि खास ग्राहक वर्ग तयार केला आहे.
रेड पुलिंग ऑइलची घोषणा करताना, डाबर इंडिया लिमिटेडचे विपणन प्रमुख-ओरल केअर हरकावल सिंह म्हणाले: “डाबर रेड पुलिंग ऑइल हे आयुर्वेदिक माउथवॉश आहे ज्यामध्ये नैसर्गिक तेल आणि जडीबुडी आहेत. हे उत्पादन आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये परिभाषित केलेल्या प्रक्रियेवर आधारित आहे आणि जगाला क्वाला-गांडूषा थेरपी या तेल-आधारित ओरल डेटॉक्स पथ्येची ओळख करून देईल. यात नारळ तेल असते, जो हिरड्या व दंतविकारापासून बचाव करते; तिळाचे तेल आहे, जे दात आणि हिरड्या मजबूत करते; तुळस श्वासाचा दुर्गंध रोखण्यासाठी; लवंग, ज्यामुळे दातदुखी कमी होण्यास मदत होते; दालचिनी तेल जे घसा खवखवण्यास आराम देते; आणि दात किडण्यापासून रोखण्यासाठी पुदीना महत्वपूर्ण भूमिका बजावते.ओरल केअरच्या फायद्यांव्यतिरिक्त, विज्ञान आधारित आरोग्यासह सुधारित हार्मोनल बॅलन्स आणि डिटोक्सिफिकेशनसह आरोग्यविषयक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हि थेरपी विशेष ज्ञात आहे. डाबर रेड पुलिंग ऑइल दात आणि हिरड्यांना बळकट करण्यास मदत करते आणि 99.9% जंतूंचा नाश करते, आणि यामुळे आपल्या तोंडाची पूर्णपणे काळजी घेतली जाते.”
आमच्या १३६ वर्षाचा वारसा आणि हजारो वर्षांचा आयुर्वेदाच्या ज्ञानाचा आधार घेऊन आम्ही डाबरच्यावतीने आरोग्यासाठी सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. व्यापक संशोधनानंतर विकसित केले गेलेले हे दात आणि हिरड्या दोन्हीसाठी तोंडाच्या आणि एकूणच निरोगीपणासाठी एक प्रसिद्ध दैनंदिन थेरपी आहे. ‘डाबर रेड पुलिंग ऑईल’ शुद्ध आणि नैसर्गिक घटकांनी बनविलेले आहे आणि दातांच्या सर्व समस्यांसाठी पूर्ण निराकरण आहे, असे सिंह म्हणाले.

हे वाचलंत का?

उदय भेंम्ब्रे यांना कोंकणी भाषा पुरस्कार

Rashtramat

‘अधिवेशनातही पाहिजे कोंकणीतच भाषणं’

Rashtramat

भारत- चीन तणाव : भारताचे २० जवान शहिद 

Rashtramat

Leave a Comment