Rashtramat

उद्यापासून ‘लोक-शास्त्र सावित्री’ विचार नाट्यमालिका

savitribai


मुंबई:
 “थिएटर ऑफ रेलेवन्स” या विचारनाट्य मंचाच्यावतीने ३ जानेवारी २०२१ पासून ‘लोक- शास्त्र सावित्री’ या नव्या नाट्यमालिकेचे सादरीकरण होणारआहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे विश्वास, अस्तित्व आणि विचार ! सावित्री बाईंनी  पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षेचालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर  पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता.त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ? या प्रश्नाचा शोध या नाट्यमालीकेतून घेण्यात येणार असल्याचे लेखक- दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी सांगितले. 3 जानेवारी ते 10 मार्च 2021 दरम्यान ‘लोक- शास्त्र सावित्री’ हे नाटक प्रस्तुत राज्यभरात प्रस्तुत होणार आहे.जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तिचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते.सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडत. भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले ,पण सावित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक वैचारिक प्रहार करत असल्याचे सांगण्यात आले. हे विचारनाट्य अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , कोमल खामकर , तुषार म्हस्के, योगिनी चौक, सुरेखा साळुंखे हे कलाकार सादर करणार आहेत. 1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले आहे.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली आहे.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, “थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत” “लोक- शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या विचारांना जनमानसात जागवण्यासाठी या नाट्य जागराला रसिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. 

हे वाचलंत का?

सचिन पायलट यांना पदांवरून काँग्रेसने हटवले

Rashtramat

‘कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष नको’

Rashtramat

‘प्रतिकारशक्तीच करू शकते कोरोनावर मात’

Rashtramat

Leave a Comment