Rashtramat

भंडारा अग्नितांडव : सरकारकडून समिती स्थापन

bhandara

भंडारा:
जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मन सुन्न करुन सोडणारी ही घटना शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.
माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

वरवरा राव यांची प्रकृती खालावली

Rashtramat

कोंकणी नाटकाच्या पहिल्या ईबुकचे आज प्रकाशन

Rashtramat

‘प्रतिकारशक्तीच करू शकते कोरोनावर मात’

Rashtramat

Leave a Comment