Rashtramat

श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात

NAIK

पणजी :
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे सपत्नीक गोकर्ण येथे जात असताना त्यांच्या गाडीला उत्तर कन्नड जिल्ह्यात अकोला येथे भीषण अपघात झाला. या अपघातात  त्यांच्या पत्नी विजया आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीपाद नाईक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची परिस्थिती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात अंकोला तालुक्यातील हिल्लूर- होसकंबी गावात झाला. नाईक कुटुंबीय येल्लापूर येथील गंटे – गणपती देवस्थानाला भेट देऊन पुढे गोकर्णला जात होते. तत्पूर्वी गणपती देवस्थानांमध्ये त्यांनी सपत्नीक पूजा केली होती. आणि संध्याकाळी ७ वाजता गोकर्णला रवाना झाले. गोकर्णला जाण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ऐवजी दुसऱ्या मार्ग घेतला. सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्यांच्या गाडीचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी उलटी झाली. या अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या डोक्याला जबर मार बसला होता, त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले जात असतानाच त्यांचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांच्यावरदेखील खासगी रुग्णालयात सुरुवातीचे उपचार केल्यानंतर आता गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना आणले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत या श्रीपाद नाईक यांच्याबद्दल संवाद साधला आहे. देशभरातून विविध स्तरातून श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी ट्विट, प्रार्थना केल्या जात आहेत. 

हे वाचलंत का?

‘लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ’

Rashtramat

अनलॉक 3 : काय सुरु, काय बंद?

Rashtramat

शिक्षकांसाठी आले ‘नवदिशा’ पोर्टल

Rashtramat

Leave a Comment