Rashtramat

‘यूपीएल’ ठरला ‘सर्वोत्कृष्ट पेटंट पोर्टफोलिओ’

UPL

मुंबई :
व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व आर्थिक प्रगतीसाठी ‘आयपी जनरेशन व संरक्षण’ स्वीकारलेल्या उद्योगांच्या सन्मानार्थ देण्यात येणारे ‘सहावे सीआयआय औद्योगिक बौद्धिक संपत्ती पारितोषिक’ ‘यूपीएल लि.’ या कंपनीने पटकावले आहे. ‘यूपीएल लि.’ने नेहमीच शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे आणि त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उत्पादने व सेवा यांची निर्मिती केली आहे.
बौद्धिक संपत्तीचे (आयपी) संशोधन व नाविन्यता यांमध्ये अग्रगण्य स्वरुपाची कामगिरी केल्याबद्दल, ‘सर्वोत्कृष्ट पेटंट पोर्टफोलिओ, लार्ज (लाइफसायन्सेस / फार्मा)’ या श्रेणीत ‘यूपीएल’ने हे पारितोषिक जिंकले. ‘यूपीएल’ने हाती घेतलेल्या संशोधनाच्या व नाविन्यतेच्या कार्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे, ‘झेबा’ हे शाश्वत उत्पादन व ‘आदर्श कृषी सेवा’. या दोन्ही उत्पादनांना तळागाळातील स्तरावर मोठे यश लाभले आहे.  
‘सीआयआय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आयपीआर अँड सीआयआय इंडस्ट्रियल आयपी अवॉर्ड्स’ या व्हर्च्युअल स्वरुपाच्या कार्यक्रमात डॉ. विशाल सोधा यांनी ‘यूपीएल’च्या वतीने हे पारितोषिक स्वीकारले. ते म्हणाले, “यूपीएल’मध्ये आमचे लक्ष शाश्वत विकासावर असते. नैसर्गिक स्रोतांचा कार्यक्षम उपयोग करणे आणि हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी लवचिक स्वरुपाचे सामर्थ्य जोपासणे, हे कार्य आम्ही करीत असतो. या कामांमधून शेतकऱ्यांना उत्पादने व सेवा उपलब्ध करुन देण्याची आमची क्षमता सिद्ध होते; यातून ‘फार्मिंग 3.0’ या नव्या युगातील शेतीला चालना मिळत आहे. शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उत्पादने व सेवा यांची निर्मिती करणे, या आमच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो. सतत नाविन्यपूर्णतेवर भर दिल्याने आम्ही दरवर्षी नवीन उत्पादने सादर करू शकतो. ‘यूपीएल’कडे मंजुरी मिळालेली 1500हून अधिक पेटंट्स आहेत आणि आमची 2500 पेटंट्स मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. विविध भागांतील शेतकऱ्यांच्या गरजा भागविणारी ही सर्व पेटंट्स आहेत.”
बौद्धिक संपत्तीची संस्कृती जोपासणे व तिचे व्यावसायिकीकरण करणे, खासगी उद्योगांची कामगिरी सार्वजनिक क्षेत्रात आणणे, भारतात व परदेशांत शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी संबंध स्थापित करणे, ‘आयपी-चालित’ कंपन्यांबद्दल सरकारला माहिती देणे आणि अशा उद्योगांना धोरण बनवण्याच्या कामात गुंतवून ठेवणे, याकरीता प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीआयआय-आयपी’ पारितोषिके देण्यात येतात. या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात, नोव्हेंबर 2020मध्ये, ‘डेरव्हेंट वर्ल्ड पेटंट्स इंडेक्स’ (डीडब्ल्यूपीआय) आणि ‘डेरव्हेंट पेटंट सायटेशन्स इंडेक्स’ (डीपीसीआय) यांच्या ‘क्लॅरिव्हेट प्लॅक्युजिंग पेटंट डेटा’तर्फे ‘इनोव्हेशन फोरम’मध्ये ‘यूपीएल’ला दक्षिण व आग्नेय आशिया नाविन्यतेचे वार्षिक पारितोषिक मिळाले होते. बौद्धिक संपत्ती हक्कांच्या क्षेत्रातील ‘सोशल टॉक्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या व भारताच्या ‘नीती आयोग दर्पण’ने मान्यता दिलेल्या एका कार्यक्रमात ‘यूपीएल’ला पेटंटच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल गौरविण्यात आलेले आहे. ‘यूपीएल’ला 2019मध्ये ‘पेटंट व ट्रेडमार्क लार्ज एन्टरप्राईज’ या श्रेणीत ‘सीआयआय’चे ‘इंडस्ट्रिअल आयपी’ पारितोषिक देण्यात आलेले आहे. तसेच, ‘जागतिक ब्रॅंड तयार करणारी अव्वल भारतीय कंपनी’ असा गौरव भारतीय पेटंट कार्यालयातर्फे 2019 मध्ये ‘यूपीएल’ला मिळाला आहे. जीनिव्हा येथील ‘वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन’तर्फे प्रतिष्ठित ‘डब्ल्यूआयपीओ यूजर्स ट्रॉफी’ देऊन ‘यूपीएल’चा सन्मान करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशी कृषी उत्पादने व सेवा यांची निर्मिती केल्याबद्दल ‘यूपीएल’ला हे सर्व गौरव प्राप्त झाले आहेत.

हे वाचलंत का?

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

Rashtramat

कोरोनाचा दिवसात तिसरा बळी

Rashtramat

‘परिक्रमा’च्या अध्यक्षपदी फिरोझ शेख

Rashtramat

Leave a Comment