पणजी :
राजधानी पणजीत ५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) उद्या १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. १६ जानेवारी ते २४ जानेवारी या काळात हा यंदाचा महोत्सव साजरा होत असून कोरोना संकटामुळे तो मोठ्या प्रमाणात जरी साजरा होत नसला तरी तो चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न गोवा मनोरंजन संस्था व राष्ट्रीय चित्रपट संचालनालयातर्फे प्रयत्न केले जात आहेत.काही प्रमाणात प्रत्यक्ष व काही प्रमाणात ऑनलाईन अशाप्रकारे यंदाचा इफ्फी होणार असून उद्या संध्याकाळी चार वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता याच ठिकाणी महोत्सवाचा समारोप सोहळा व पुरस्कार वितरण होणार आहे.पणजी येथील आयनॉक्स थिएटर्स तसेच मेकँनीज पँलेस यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली असल्यामुळे वेगळ्या वातावरणात यंदाचा महोत्सव सुरू होत आहे. युरोप देशांमध्ये आलेल्या दुसऱ्या प्रकारच्या कोरोनाच्या संकटामुळे गोव्याकडे युरोपमधून येणारी विमाने बंद आहेत. त्यामुळे यंदाच्या इफ्फीत विदेशी मान्यवर कलाकार, दिग्दर्शक ,तंत्रज्ञ येणार नसले तरी भारताच्या विविध भागातून काही कलाकार व दिग्दर्शक पणजीत येण्याची शक्यता आहे.कोरोना नियमावलीचे पालन करून चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. त्याचबरोबर इतर चर्चासत्रे व कार्यक्रम होणार आहेत. काही प्रतिनिधींना ऑनलाइन चित्रपट पाहण्याची सोयही करण्यात आली आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई हे जातीने सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments