पणजी :
‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात इटालियन चित्रपटसृष्टीतील लेखक व्हिटोरिओ स्टोरो यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. उद्घाटन सोहळ्याला कर्नाटकचे लोकप्रिय अभिनेता सुदीप संजीव उर्फ ‘किच्या सुदीप यांची उपस्थिती असणार आहे. ‘अँपोकॅलिप्स नाऊ'”रेडस’आणि ‘द लास्ट एम्परर’ या चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट छायाचित्रांकनासाठी तीन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. तीन वेळा हा पुर्कार जिंकलेल्या तीन जिवंत व्यक्तींपैकी स्टाररो हे एक आहेत.
उद्घाटन सोहळा शनिवारी, दुपारी 3ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होईल. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता कला अकादमी येथे डॅनिश फिल्ममेकर थॉमस विन्टररग दिग्दर्शित द अनादर राउंड या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडेल.
यावर्षी विविध विभागांतून एकूण २९४ चित्रपट पाहता येणार असून, आजपर्यंत एकूण २२४६ प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. दरम्यान, गोवा मनोरंजन संस्थेच्या समोर वरिष्ठ व्यक्ती, विशेष व्यक्ती, प्रतिनिधी आणि मीडिया कक्ष उभारण्यात आले आहेत. यंदा उद्धाटन सोहळा आणि फिजिकल स्क्रौनिंगसाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी केवळ २००जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे,
‘कियोक्षी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट ‘वाईफ ऑफ ए स्पाय’ या चित्रपटाने होत्सवाची सांगता होईल.
सत्यजित रे यांना आदरांजली
जागतिक कीर्तीचे ‘सिनेदिग्दर्शक नि्माते सत्यजित रे यांना विशेष आदरांजली वाहिली जाणार आहे. या महोत्सवात सत्यजित रे यांचे निवडक चित्रपट बघण्याची संधी रसिकांना मिळेल, २०९९ मध्ये आलेल्या इपी सुवर्णमहोत्सवात माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी ही घोषणा केली होती, सत्यजीत रे यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त ही विशेष’आदरंजली
वाहिली जाणार आहे.