Rashtramat

‘अधिवेशनातही पाहिजे कोंकणीतच भाषणं’

konkani

पणजी :
मराठी भाषेला आमचा विरोध नाही पण कोंकणी हि आमची राजभाषा असल्याने कोंकणीचा विरोध आणि द्वेष खपवून घेतला जाणार नाही. अशी तीव्र भूमिका राज्यातील तरुण कोंकणीप्रेमी आज घेतली. पर्वरीतील गोमंतक मराठी अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोंकणीबद्दल द्वेषपूर्वक लिखाण केल्याच्या निषेधार्ह राज्यभरातील कोंकणीप्रेमींनी जनमत दिनानिमित्त ‘अस्मिताय जागर’ कार्यक्रमाचे आयोजन गोमंतक मराठी अकादमीसमोर केले होते. त्यावेळी तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या निदर्शनात सहभागी एका तरुणाने, गोव्याच्या विधानसभेमध्ये अधिवेशनात मराठीत भाषणं झालेली आहेत. आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून, यापुढे जर राज्याच्या अधिवेशनामध्ये मराठीमध्ये भाषण झाले तर आम्ही विधानभवनासमोर आंदोलन करू. नेत्यांनी फक्त निवडणुकीसाठी कोंकणीपण आणि गोंयकारपण दाखवण्यापेक्षा विधानभवनात कोंकणीतच बोलून आपले भाषाप्रेम स्पष्ट करावे. गोव्याचं महाराष्ट्रात विलिनीकरण झालं असतं, तर गोव्यात आज ४० मतदारसंघ नसते. फक्त दोन ते चार मतदारसंघच असते. या चोरांना आमदार होण्याचीसुद्धा संधी मिळाली नसती. त्याचप्रमाणे राजकीय बॅनर, पोस्टर, पोस्ट सगळं कोकणीत करता आणि मराठीत बोलता, यावर आमचा आक्षेप असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले. ‘आमच्या भाषेचा द्वेष करणाऱ्यांनी आम्हाला दुखावलंय. जर संविधान कोकणीला मान्यता देतं, तर इतरांच्या पोटात कोकणीमुळे का दुखतं’, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
konkani
‘महाराष्ट्रवादी संपले असले तरी मराठीवादी अजूनही आम्हाला दुखावत आहे. आमचा मराठीबाबत द्वेष नाही, मात्र मराठीवादी असलेल्यांनी कोकणीचा द्वेष करु नये’, असं या निदर्शनात सहभागी झालेल्या तरुणीनी म्हटलंय. कोकणीला नावं ठेवणाऱ्यांना फक्त गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेर असणारेही उत्तरं देतील, असेही यावेळी ठणकावण्यात आले. 
भाषेसाठी लढणाऱ्यांबाबत मेळावलीवासीयांनीही अभिमान व्यक्त केला. तसंच स्वयंघोषित विद्वान जे भाषेचा वाद करु पाहत आहेत, त्यांनी वेळीच हे थांबवावं, असाही इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी भवनाचं खंडर करणाऱ्यांनी हे मराठी भवन आमच्या हातात द्यावं, आम्ही ते चालवून दाखवू, असे आव्हानही यावेळी देण्यात आले. यावेळी कोंकणीचा द्वेष करणाऱ्यांचे प्रतीक म्हणून  गवती गाढवाला जाळण्यात आलं. जय कोकणीचा नारा देत यावेळी मराठी भवनाच्या गेटवर पोस्टरबाजी करण्यात आली. श्वास कोकणी, ध्यास कोकणी असे नारेही यावेळी लावण्यात आले.

हे वाचलंत का?

जगण्याचा तोल सांभाळणारी ‘शांताबाई’

Rashtramat

मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह

Rashtramat

कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू

Rashtramat

Leave a Comment