Rashtramat

‘पहिल्या सिनेमाचा आनंद वेगळाच…’

iffi51

पणजी :
येथे सुरु असलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवोदित चित्रपट निर्माते शरण वेणुगोपाल आणि अभिनेते / निर्माता भार्गव पोलुदासू यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांचे चित्रपट यावर्षी इफ्फीच्या भारतीय पॅनोरमामध्ये निवडले गेले आहेत.
आपल्या-37 मिनिटांच्या मल्याळम नॉन-फिचर फिल्म (ओरू पाथीरा स्वप्नम पोल) विषयी बोलताना शरण वेणुगोपाल म्हणाले, एखाद्याचा व्यक्तिगत आवाका निश्चित करणे अवघड आहे; या कथानकावर आधारित हा चित्रपट आहे. शीर्षकाचा मतितार्थ ‘मध्यरात्रीचे स्वप्न’ असा होतो.
आम्ही मार्च 2020 दरम्यान या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते; त्यानंतर देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. आमचा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही याबद्दल आम्हाला शंका होती. परंतु यावर्षी इफ्फीच्या भारतीय पॅनोरमा अंतर्गत आमच्या चित्रपटाची निवड होऊन तो प्रदर्शित झाला याचा आम्हाला खूप आनंद आणि समाधान आहे. अशा भावना चित्रपटाविषयी बोलताना वेणुगोपाल यांनी व्यक्त केल्या.
iffi51
तेलगू फिल्म ‘गथम’ चे अभिनेता आणि निर्माता भार्गव पोलुदासू यांनी देखील इफ्फीच्या भारतीय पॅनोरमा फीचर फिल्मअंतर्गत निवड झालेल्या आपल्या चित्रपटाविषयीचे अनुभव कथन केले. ओटीटी मंचावर तेलगू भाषेत 2020 मध्ये ‘गथम’ खूपच गाजला. सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत असताना, मी आणि माझ्या सहकार्‍यांनी आठवड्याच्या उत्तरार्धात काही तास हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी राखून ठेवले. चित्रपटाविषयीच्या ओढीनेच आम्ही हे साध्य करू शकलो असे आपल्या चित्रपटाविषयी बोलताना पोलुदासू म्हणाले.
या चित्रपटासाठी पैशांची तजवीज करताना तसेच कॅलिफोर्नियाच्या हिवाळ्यात आव्हानात्मक परिस्थितीत काम करताना सहकार्‍यांना येणार्‍या अडचणींविषयी त्यांनी माहिती दिली. कमी कलाकारांसोबत हा चित्रपट बनवताना त्यांना सर्व प्रकारची कामे करावी लागली. स्वयंपाक, धुणी-भांडी आणि अभिनय या सार्‍याच गोष्टी कराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.
सिनेमॅटोग्राफीबद्दल बोलताना, पोलुदासू म्हणाले की, प्रारंभिक दृश्य पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले कि या चित्रपटाचा आवाका जास्त आहे. त्यांनी प्रेक्षकांना सांगितले की चित्रपट निर्मिती ही त्यांच्या कल्पनेपेक्षा विस्तृत प्रक्रिया आहे. चित्रपट कसा बनवायचा हे देखील मी शिकलो. यापूर्वी मी कोणत्याही चित्रपटाविषयी किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्याच्या गुणवत्तेविषयी टिप्पण्या पाठवायचो. पण आता हा चित्रपट बनल्यानंतर, प्रत्येकाला सांगायला मला एक गोष्ट आहे जर कोणी चित्रपट बनवला असेल तर त्यांचा आदर करा.
iffi51

हे वाचलंत का?

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

Rashtramat

‘म्हाका नाका गे’वर गोलमेज चर्चा

Rashtramat

इफ्फीतील पीआयबी टीम

Rashtramat

Leave a Comment