Rashtramat

गांधीवादी विचारवंत गुरुनाथ केळेकर कालवश

gurunath

मडगाव :
गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, जुन्या काळातील पत्रकार, साहित्यिक आणि गोव्यातील मार्ग चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांचे वय ९१ वर्षे होते. बुधवार दि. २० रोजी मडगाव येथील हिंदू स्मक्षानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पुत्र डॉ. समीर आणि विवाहित कन्या डॉ. चित्रा जुवारकर व डॉ. संजीवनी केणी असा परिवार आहे.
मूळ प्रियोळ येथील पण मडगाव हीच आपली कर्मभूमी ठरविलेले केळेकर हे हल्लीच आपली कन्या डॉ. केणी यांच्या घरी राहायला गेले होते. तिथेच मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आपण कुठेही असलो तरी आपले अंत्यसंस्कार मडगाव येथेच व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छप्रमाणे बुधवारी मडगाव स्मक्ञानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यांचे पार्थिव त्यांच्या मालभाट (जुन्या हरिमंदिर जवळ) येथील कामत बिल्डिंग मधील घरी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.

हे वाचलंत का?

कोरोनामुळे आज तीन मृत्यू; एकूण बळी ३२

Rashtramat

अमित शहा पुन्हा एम्समध्ये दाखल 

Rashtramat

कोंकणी नाटकाच्या पहिल्या ईबुकचे आज प्रकाशन

Rashtramat

Leave a Comment