Rashtramat

मुंबईत साकारले देशातील पहिलेवहिले हिअरिंग केअर साउंड सेंटर

मुंबई:
हिअरिंग केअरसाठी भारतातील पहिल्यावहिल्या साऊंड सेंटरचे आज माजी कसोटी क्रिकेटपटू आणि साऊंड एम्बेसेडर पद्मश्री सईद किरमाणी आणि डब्ल्यूएसए इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 
जागतिक दर्जाचे हे साऊंड सेंटरचे व्यवस्थापन आणि कार्यचलन अर्थव स्पीच अॅण्ड हिअरिंग केअर प्रा.लि.तर्फे केले जाणार आहे. मुंबई, ठाणे, गोवा आणि आता मुंबईत या कंपनीतर्फे हिअरिंग अॅण्ड स्पीच थेरपी सेंटर्सची व्यावसायिक चेन चालवली जाते. या सेंटरमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने सर्व वयोगटासाठीचे श्रवण माध्यमांचे सुयोग्य पर्याय उपलब्ध करून दिले जातात.  
साऊंड एम्बेसेडर सईद किरामाणीही आजवर वाइडेक्स मुमेंट या अत्यंत आधुनिक हिअरिंग एडचे वापरकर्ते होते. विलंबकाल शून्यावर आणणाऱ्या तंत्रज्ञानामुळे वाइडेक्स मुमेंट या क्रांतीकारी यंत्राने अत्यंत नैसर्गिक आणि मूळ स्वरूपाचा आवाज ऐकू येण्याची किमया साधली. वाइडेक्स या जगातील अव्वल क्रमांकाच्या ब्रँडमधील वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आणि विश्वासार्ह आहेत. या नव्या साऊंड सेंटरमुळे वैयक्तिक श्रवण समस्यांवर खास व्यक्तिगणिक तयार केलेले पर्याय उपलब्ध होतील. बोलण्यात आणि ऐकण्यात समस्या जाणवणाऱ्या मुलांमधील निदानापासून वैयक्तिक गरजा आणि आवश्यकतांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला योग्य पर्याय पुरवणे अशा सोयी इथे आहेत.

या साऊंड सेंटरमध्ये श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी टिनिटस (कानात सतत एक गुणगुण असा आवाज येत राहणे), हिअरिंग स्क्रीनिंग, वाइडेक्स डिजिटल हिअरिंग एड्स, बॅटरीज आणि हिअरिंग एड अॅक्सेसरीज अशा खास सेवाही उपलब्ध आहेत. या उद्घाटनप्रसंगी अविनाश पवार म्हणाले, : अर्थव साऊंड सेंटरमध्ये साऊंड स्टेशन आणि अॅक्सेसरी लाऊंज आहे. त्यामुळे, वापरकर्त्यांना कोणत्याही विपर्यास किंवा अडथळ्याविना कनेक्टिव्हिटी आणि श्रवणातील स्पष्टतेचा अनुभव घेता येतो. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना अथर्वचे व्यवस्थापकीय संचालक विकास राऊत म्हणाले, या साऊंड सेंटरमागील मूळ विचार म्हणजे जागतिक दर्जाची हिअरिंग केअर डिलिव्हरी प्रणाली उभारणे आणि श्रवणदोष असलेल्या मुंबईतील व्यक्तींसाठी श्रवणयंत्रांचे वितरण आणि सेवेचा दर्जा वृद्धिंग करणे.

हे वाचलंत का?

‘रॅटरेस म्हणून बाहेर पडण्याची गरज’

Rashtramat

का झाली अर्णब गोस्वामीला अटक? काय आहे नेमके प्रकरण?

Rashtramat

‘हा पुरस्कार माझ्या तत्वात बसत नाही’

Rashtramat

Leave a Comment